शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:52 IST

Hyderabad Heart Attack Death: हैदराबादमध्ये एका तरुणाचा शटल खेळत असतानाच हृयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Hyderabad Heart Attack Death: गेल्या काही काळापासून लहान वयातच हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र आता शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळतानाही हृदयविकाराच्या झटक्याने अनेक तरुणांचे मृत्यू होत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान षटकार मारल्यानंतर, फलंदाजाचा मैदानातच हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हैदराबादमध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा शटल खेळताना हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हैदराबादमधील नागोले स्टेडियममध्ये शटल खेळत असताना एक तरुण अचानक जमिनीवर पडला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गुंडला राकेश (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. राकेश खम्मम जिल्ह्यातील थल्लाडा गावातील माजी उपसरपंच गुंडला वेंकटेश्वरलू यांचा मुलगा आहे. राकेश हैदराबादमध्ये एका खाजगी कंपनीत काम करत होता. रविवारी तो त्याच्या मित्रासंह शटल खेळण्यासाठी नागोले स्टेडियममध्ये आला होता. मात्र शटल खेळत असतानाच त्याला मृत्यूने गाठलं. रात्री आठच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला.

रविवारी राकेश कोर्टवर शटल खेळत होता. त्याने शॉट खेळल्यानंतर तो थोडासा पुढे गेला. त्यानंतर समोरच्या कोर्टमधून कॉक मागे गेल्यामुळे तो आणण्यासाठी राकेश गेला. राकेश कॉक उचलून उभा राहत होता तितक्यात तो जोरात कोसळला. तितक्यात त्याच्या मित्रांनी धाव घेतली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. एकाने त्याला सीपीआर देखील देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी राकेशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने राकेशच्या कुटुंबाला आणि त्याच्या मित्रांना जबर धक्का बसला.

कोलेस्टेरॉलच नाही तर फॅट्समुळेही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, ६ लक्षणे दिसल्यास व्हा सावध!दरम्यान, गेल्या महिन्यात सोशल मीडियावर षटकार मारल्यानंतर एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये फलंदाजाने षटकार मारल्यानंतर धावत होता. मात्र खेळपट्टीच्या मध्यभागीच तो गुडघे टेकून बसला आणि तोंडावर पडला. त्याला बेशुद्ध पाहून इतर खेळाडू त्याला मदत करण्यासाठी धावले आणि त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केले. पण तो शुद्धीवर आला आणि हृदयविकाराच्या झटक्याने लगेचच त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाSocial Viralसोशल व्हायरलHealthआरोग्यHeart DiseaseहृदयरोगViral Videoव्हायरल व्हिडिओ