शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाईट स्वप्न पडतात; हे आजाराचे लक्षण आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:33 IST

सातत्याने घडत असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे अवश्यक

मुंबई : बहुतांश नागरिकांना झोपेत स्वप्न पडत असतात. काही नागरिकांना चांगली स्वप्ने पडतात, तर काहींना वाईट स्वप्ने पडत असतात. काही व्यक्तींना क्वचित कधी तरी स्वप्न पडतात. तर काही व्यक्तींना अनेकवेळा ही स्वप्ने पडत असतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जर सातत्याने अशा पद्धतीने वाईट स्वप्ने पडत असतील तर त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे.  ही स्वप्ने नक्कीच का पडतात? या प्रश्नाचे उत्तर शोधून काढून त्यावर उपचार होणे गरजेचे आहे. त्यावर आजार आहे की नाही, हे निश्चित निदान करणे होणे महत्त्वाचे आहे. वारंवार वाईट स्वप्ने पडणे नक्कीच काळजीचे कारण आहे. 

यावर उपाय काय?  कुठल्याही गोष्टीची अतिकाळजी करू नये. व्यसनांपासून दूर राहावे. संतुलित आहार करावा. झोपेची निश्चित वेळ ठरवावी, त्यानुसार झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. प्राणायाम, योगासारखे प्रकार करावेत. मानसिक ताण-तणावाखाली असेल तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हे आजाराचे लक्षण आहे का? एखाद्या व्यक्तीला क्वचित स्वप्न पडू शकते. मात्र, जर त्या व्यक्तीला वारंवार वाईट स्वप्ने पडत असतीलतर नक्कीच त्यांनी व्यावसायिक मदत घेणे गरजेचे आहे. मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून समुपदेशन करून घेणे महत्त्वाचे आहे. स्वप्नं का पडतात? याची  कारणे शोधून काढणे गरजेचे आहे आणि त्यानुसार उपचार करावे लागतात. केवळ स्वप्नं पडतात हा आजार असू शकत नाही. त्याचाशी संबंधित अनेक गोष्टी असतात. त्या शोधून काढाव्या लागतात. 

वाईट स्वप्न का पडतात?

या अशा पद्धतीची लक्षणे घेऊन नागरिक आमच्याकडे येत असतात. मात्र, आम्ही त्याला लगेच काही तरी आजार आहे असे लेबल लावत नाही. त्या व्यक्तीशी बोलून नेमकं हे कशामुळे होतंय, हे जाणून घेतो. त्यानंतर त्याला असणाऱ्या लक्षणांसाठी काही औषधोपचाराराची गरज असेल तर ती आम्ही करतो. वारंवार वाईट स्वप्नं पडत असतील तर नक्कीच काळजीचे कारण आहे. त्यावर वैद्यकीयशास्त्रात उपाय आहेत. - डॉ. सारिका दक्षीकर, मानसोपचारतज्ज्ञ, जी.टी.हॉस्पिटल

टॅग्स :Healthआरोग्य