शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चमकदार, मुलायम आणि मजबूत केसांसाठी कधी, कसं आणि किती तेल लावावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 09:41 IST

Hair Care Tips : चला याबाबतच काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याचा फायदा तुम्हाला नक्कीच केस वाढवण्यासाठी, केस मुलायम आणि चमकदार करण्यासाठी होईल.

Hair Care Tips : केसांना तेल लावण्याचे फायदे सर्वांनाच माहीत असतात. पण फक्त तेल लावून केसांना फायदा होतो असं नाही तर तेल कधी, कसं आणि किती वेळ लावावं हेही माहीत असायला हवं. सोबतच याचीही माहिती असली पाहिजे की, तुमच्या केसांसाठी कोणतं तेल फायदेशीर आहे. चला याबाबतच काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याचा फायदा तुम्हाला नक्कीच केस वाढवण्यासाठी, केस मुलायम आणि चमकदार करण्यासाठी होईल.

१) केसांना तेल लावण्याआधी तेल हलकं गरम करावं. कोमट तेल केसांसाठी फॉलिकल्स उत्तेजित करण्यास मदत करतात. त्यामुळे केसांना नेहमी कोमट तेल लावा. साधं तेल लावण्यापेक्षा कोमट तेलाचा फायदा तुम्हाला अधिक बघायला मिळेल.

२) अनेकजण केसांवर तेल ओततात, पण ही केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत अजिबात नाही. एका बाउलमध्ये कोमट तेल घ्या, नंतर बोटांच्या मदतीने तेल केसांना आणि केसांच्या मूळांना लावा. डोक्याच्या त्वचेलाही व्यवस्थित तेल लावा.

३) जेवढी गरज आहे तेवढंच तेल केसांना लावा. तुम्हाला वाटत असेल की, जास्त तेल लावल्याने जास्त फायदा होईल तर तुम्ही चुकताय. जास्त तेल लावाल तर केस धुतांना शॅम्पूचा जास्त वापर करावा लागेल.

४) केसांना तेल लावताना मसाज करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तेल लावताना १० ते १५ मिनिट हलक्या हाताने डोक्याच्या त्वचेची मसाज करा. मसाज केल्याने डोक्याच्या त्वचेमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो आणि केसांना पोषण मिळतं.

५) चांगल्या रिझल्टसाठी केसांना रात्रभर तेल लावून ठेवा. याने तुम्हाला पुरेसा फायदा होईल. जर तुम्ही रात्रभर केसांना तेल लावून ठेवत नसाल तर निदान दोन ते तीन तास केसांना तेल लावून ठेवा. 

६) तेल लावल्यावर केसांना शक्य असेल तर वाफ द्यावी. याने केस सुकण्यास मदत होईल. केसांना वाफ देण्यासाठी टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि तो १० मिनिटांसाठी केसांना बांधून ठेवा. असं करताना टॉवेल फार जास्त गरम असू देऊ नका. 

७) वाफ दिल्यानंतर केस धुवावे. शॅम्पूची निवड तुमच्या केसांनुसार करावी. जर केस ऑयली असतील तर ऑयली केसांसाठी फायदेशीर शॅम्पू खरेदी करा. जर केस ड्राय असतील तर तसा शॅम्पू खरेदी करा.

८) केस मुलायम ठेवण्यासाठी कंडीशनर करायला विसरू नका. तसेच केस भिजलेले असताना त्यात कंगवा फिरवू नका. अशावेळी केस तुटू शकतात. केस सुकू द्या नंतर कंगवा फिरवा.

९) दाट, लांब आणि चमकदार केस मिळवण्यासाठी केसांना ऑयलिंग, मसाज, शॅम्पू, कंडीशनर इत्यादी गोष्टीट पुरेशा नाहीत. हेल्दी केसांसाठी हेल्दी पदार्थ खाणंही गरजेचं आहे. त्यामुळे डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.  

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स