मराठी सेलिब्रेटींची गुज्जू पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 16:08 IST
विचारात पडला ना गुज्जू पार्टी आता काय असते? हेच जाणून घेण्यासाठी लोकमत सीएनएक्सने अभिनेत्री प्रिया बापट हिच्याशी संवाद साधला
मराठी सेलिब्रेटींची गुज्जू पार्टी
विचारात पडला ना गुज्जू पार्टी आता काय असते? हेच जाणून घेण्यासाठी लोकमत सीएनएक्सने अभिनेत्री प्रिया बापट हिच्याशी संवाद साधला असता प्रिया म्हणाली, गुज्जू पार्टी म्हणजे गुजराती मेन्यू असणारी ही पार्टी होती. खूप दिवस आम्ही सर्वजण एकत्रित भेटलो नसल्यामुळे सोनल जाधव हिने ही पार्टी ठेवली होती. सोनल ही मराठी इंडस्ट्रीचे कोरिओग्राफर उमेश जाधव यांची वाईफ आहे.तसेच आमच्या सर्वाची खूप खास मैत्रिण आहे. तिने ही वूमनहूड पार्टी आयोजित केली होती. यामध्ये तिने स्वत: आमच्यासाठी खास गुजराती पदार्थ बनविले होते. यामध्ये डेपला, दाल, पराठे, रायता यांसारखे गुजराती पदार्थावर आम्ही सर्वानी ताव मारला. फुलवा खामकर, उर्मिला कानिटकर-कोठारे, सोनल खरे आनंद आम्ही सर्वानी खूप धमाल केली.