शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात आरोग्याला जपा

By admin | Updated: June 8, 2017 02:32 IST

उन्हाळ्याचे चटके सहन करून आता कुठे पावसाचा शिडकावा सुरू झाला नाही, की लगेचच प्रत्येक घरात आरोग्यविषयक कुरबुरी ऐकू येतात.

- डॉ.माधुरी पिसे, फिजिशिअनउन्हाळ्याचे चटके सहन करून आता कुठे पावसाचा शिडकावा सुरू झाला नाही, की लगेचच प्रत्येक घरात आरोग्यविषयक कुरबुरी ऐकू येतात. प्रत्येक घरातील ‘आई’ सतत हे खाऊ नको, पावसात भिजू नको, थंड पेय नकोच.. असे सतत सांगत असते. त्यामुळे आता पावसाला ‘वेलकम’ करून स्वत:ची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स...पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचा ओली राहिल्यामुळे हानी होऊ शकते. डोक्यापासून ते पायापर्यंत त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. फंगल इन्फेक्शन, स्केबीज इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. ओले शूज पायात ठेवल्यामुळे पायाला खाज येणे, रॅशेस तसेच फंगल्स इन्फेक्शन होऊ शकते. याचा जास्त करून पुरुषांना त्रास होतो. स्त्रियांमध्ये स्तनाच्या खाली डाग येणे, काखेत डार्क सर्कल येणे असा ओलेपणामुळे त्रास होऊ शकतो.त्वचा कोरडी असेल तर ती आणखी कोरडी होऊ शकते. तसेच तेलकट त्वचा असल्यास ती अधिक तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. ओलेपणामुळे पुरळ येण्याने त्वचेला विविध प्रकारची हानी होऊ शकते. पावसाळ्यात त्वतेची ह्युमिनिटी कमी होते. केसात कोंडाही जास्त होता. त्यांचे इन्फेक्शन कपाळावर होऊ शकते; तसेच केस चिकट होणे, केसात खाज येणे असे प्रकार होऊ शकतात. यासाठी आठवड्यात दोनदा ते तीनदा केस धुणे आवश्यक आहे.ओले राहू नये, कपडे बदलावे, आॅफिसमध्ये चपलांचे वेगळे जोड वापरावे. त्यामुळे पायांवर त्वचेचे विकार होणार नाहीत. जास्तीतजास्त सुती कपडे वापरावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने अ‍ॅन्टीडस्टी फंगल पावडर वापरावी. तसेच त्वचेवर काही अ‍ॅलर्जी उठल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे. पावसाळ्यात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते; तसेच इन्फेक्शन होऊ शकते. डोळ्यांना अधिक त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांत ड्रॉप टाकावेत. या काळात आपली पचन संस्था खूप नाजूक असते. त्यामुळे आपण जे खाऊ ते पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे पोट बिघडणे, उलट्यांसारखे प्रकार जास्त प्रमाणात होत असतात. व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आजारपण वाढते. दूषित पाण्यामुळेही अनेक आजार उद्भवत असतात. दहीपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, भेळ यांसारखे पदार्थ खाणे टाळावे. पाणी उकळून प्यावे. सॅलेड, फळ यांचा आहारात समावेश असावा.पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचा ओली राहिल्यामुळे हानी होऊ शकते. डोक्यापासून ते पायापर्यंत त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. फंगल इन्फेक्शन, स्केबीज इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. ओले शूज पायात ठेवल्यामुळे पायाला खाज येणे, रॅशेस तसेच फंगल्स इन्फेक्शन होऊ शकते.