शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

GOQii Health Tech: हेल्थ टेक क्षेत्रात 'गोकी'चा दबदबा; कंपनीने लॉंच केला 'हेल्थ मेटाव्हर्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 20:11 IST

आरोग्य आणि गेमिंग तंत्रज्ञानाला एकत्र जोडण्याची ही भन्नाट कल्पना गोकी नागरिकांसाठी घेऊन आलंय.

 हेल्थ टेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गोकी (GOQii) ने आचा स्वत:चा हेल्थ मेटाव्हर्स तयार केलाय. आरोग्य आणि गेमिंग तंत्रज्ञानाला एकत्र जोडण्याची ही भन्नाट कल्पना गोकी नागरिकांसाठी घेऊन आलंय. तशी घोषणा गोकी चे संचालक विशाल गोंदाल यांनी केली. या हेल्थमेटाव्हर्समध्ये गेम खेळत स्पर्धा करत तुम्ही आरोग्यावर नियंत्रण ठेऊ शकता. स्पर्धेमुळे अजुन फिट राहण्याचे प्रोत्साहन मिळते हेच या हेल्थमेटाव्हर्समधून करता येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात हे मोठे पाऊल आहे.

याशिवाय गोकी ने आज युनायटेड अरब अमिरात (यूएई) मध्ये आता प्रवेश केल्याची घोषणा केली. यूएई हा देश गोकी ने प्रवेश केलेला भारत आणि यूके नंतरचा ‍तिसरा देश ठरला आहे. यूएई मध्ये आता सुरुवातीच्या काळात गोकी तर्फे सर्व समावेशक प्रतिबंधात्मक हेल्थ इकोसिस्टम आणि वेब३ वर आधारीत डिजिटल हेल्थ मेटाव्हर्स उपलब्ध असतील.  गोकी ने या आधीही ‍ गिटेक्स ग्लोबल या जगातील सर्वांत मोठ्या टेक शो मध्ये भाग घेतला होता आणि त्याच बरोबर जीसीसी क्षेत्रात गुंतवणूक करुन वाढ करण्याचा मानस व्यक्त केला होता.

यूएई मध्ये हेल्थ मेटाव्हर्स प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने गोकी ने हार्ले इंटरनॅशनल मेडिकल क्लिनिक बरोबर भागीदारी केली आहे.  त्यामुळे आता यूएई च्या नागरिकांना सर्वसमावेशक डिजिटल डायबेटिस केअर प्रोग्राम उपलब्ध होणार आहे.  ही घोषणा गोकीचा वार्षिक कार्यक्रम असलेल्या ‘रिइमॅजिन हेल्थ इन दी मेटाव्हर्स’ या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबई येथे ८ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आली. गोकीचे संस्थापक आणि सीईओ विशाल गोंदाल यांनी सांगितले “ हार्ले इंटरनॅशनल मेडिकल क्लिनिक बरोबर सहकार्य करतांना आंम्ही खूपच उत्साही आहोत. आम्ही नेहमीच डिजिटल आरोग्यासह प्रतिबंधात्मक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले असून त्याच बरोबर वापरकर्त्यांना समृध्द अनुभव हा फिटनेस चा प्रसार व आरोग्यपूर्ण बक्षिसे देऊन  देऊ केला आहे.  डिजिटल हेल्थ आणि फिटनेस मेटाव्हर्स मुळे पुढे जाऊन खर्‍या जगतातील आरोग्य आणि फिटनेस एकत्र आणून जगभरांतील ग्राहकांना एकत्र आणून फिट आणि आरोग्यपूर्ण राहण्यास मदत होईल.  हार्ले इंटरनॅशनल मेडिकल क्लिनिक बरोबर एकत्रितपणे लोकांना मधुमेहाचे व्यवस्थापन करुन त्यांच्या आरोग्या विषयी तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांचे जीवन सुधारण्यास मदत होईल.”

प्रत्येक वापरकर्त्याला सर्वसमावेशक डिजिटल मंचाच्या माध्यमातून जोडले जाईल आणि त्यांना अत्याधुनिक अशी जोडलेली उपकरणे, आरोग्य विषयक प्रशिक्षक, डॉक्टर्स यांच्या सल्ल्यानुसार त्यांची जीवनशैली बदलून त्यांच्या एचबीए१सी स्तरावर नियंत्रण ठेवण्यास मदत केली जाते. 

टॅग्स :Healthआरोग्यtechnologyतंत्रज्ञानMumbaiमुंबईDubaiदुबईArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स