शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 09:05 IST

ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आले त्यांच्यात नाडीचे ठोके, रक्तदाब, ताप आणि श्वसनाची गती या लक्षणांमध्ये त्वरित सुधारणा झाल्याचे आढळले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत असून कोरोनाप्रतिबंधक लसींच्या उत्पादनाला लागणाऱ्या मंजुऱ्या तातडीने देत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुढाकाराने बाजारात आलेले ‘२-डिऑक्सी डी-ग्लुकोज’ अर्थात ‘२-डीजी’ हे औषध गेम चेंजर ठरणार आहे. जाणून घेऊ या औषधाविषयी...

‘२-डीजी’ औषधाला गेम चेंजर का संबोधले जात आहे?डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅबरोटरीज या दोघांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या ‘२-डीजी’ औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांवेळी या औषधाच्या मात्रा ज्यांना दिल्या गेल्या त्या रुग्णांपैकी ४२ टक्के रुग्णांना तिसऱ्या दिवशी बाहेरून ऑक्सिजन देण्याची गरज भासली नाही 

ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आले त्यांच्यात नाडीचे ठोके, रक्तदाब, ताप आणि श्वसनाची गती या लक्षणांमध्ये त्वरित सुधारणा झाल्याचे आढळले. ६५ वर्षे वय असलेल्या रुग्णांमध्येही सकारात्मक बदल निदर्शनास आले. ‘२-डीजी’ औषधाने केवळ ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होत नाही तर रुग्णालयातील मुक्कामाचा अवधीही कमी करतो, असा दावा डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

विषाणूला मिळणारी ऊर्जा रोखते

  • ‘२-डीजी’ औषध फक्त कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या पेशींमध्ये जमा होते.
  • कोरोना विषाणू ऊर्जेसाठी या औषधाचा ग्लुकोज समजून वापर करायला लागतात.
  • येथेच फसगत होते. विषाणूला ऊर्जा प्राप्त होत नाही उलटपक्षी ऊर्जा रोखली जाते. त्यामुळे विषाणूचा फैलाव बंद होतो.

 

अति करू नका..कोरोनापासून बचाव करण्याच्या नावाखाली हे औषध अतिप्रमाणात घेऊ नये, असेही सूचित करण्यात आले आहे

किंमत किती असेल

₹ ५०० ते ६०० जेनेरिक औषध असल्याने औषधाच्या एका पाऊचची किंमत

कमी किमतीत त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येऊ शकेल. ‘२-डीजी’च्या निर्मितीसाठी विदेशी कच्च्या मालावर अवलंबून रहावे लागणार नाही.

औषध कसे आणि किती घ्यावे...

ग्लुकोज पावडरींप्रमाणे हे औषध पाऊचमध्ये पावडर स्वरूपात मिळू शकेल. 

ते पाण्यात टाकून बाधिताला दिले जाते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये, असा सल्ला डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या