शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तापमानवाढीमुळे बिघडणार मानसिक आरोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 13:05 IST

२००५ साली हरिकेन वादळ आलेल्या लोकांच्या मानसिक तक्रारींमध्ये इतर सुरक्षित जागी राहाणाऱ्या लोकांच्या तक्रारींपेक्षा ४ टक्क्यांनी वाढ झाली होती.  तसेच ३० अंशांपेक्षा तापमान वाढल्यानंतर मानसिक आरोग्य बिघडण्याच्या संख्येत १ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसून आले.

न्यू यॉर्क- जागतिक तापमानामध्ये जशी वाढ होत जाईल तशी मानसिक आरोग्यासंदर्भातील तक्रारींमध्ये वाढ होत जाईल अशी भीती एका अभ्यासामधून व्यक्त करण्यात आली आहे. २०१६ हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून ओळखले जाते. अमेरिकेमध्ये आजवरच्या इतिहासात सध्या मानसिक आजारांच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मॅसेच्युसेटस इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नोलजी (एमआयटी) आणि हार्वर्ड विद्यापीठाने तापमान वाढ आणि मानसिक आजार एकत्र येणे हा योगायोग नसल्याचे म्हटले आहे.

तापमानामध्ये एका अंशाने वाढ झाल्यावर मानसिक आरोग्याच्या तक्रारींमध्ये दोन टक्क्यांनी वाढ होते असा निष्कर्ष या संस्थांनी काढला आहे. पृथ्वीवरच्या प्रत्येक प्रजातीला तापमानवाढीचे परिणाम भोगावे लागत आहेत. पण मनुष्याच्या मानसिक आरोग्यावर त्याचे परिणाम होत आहेत. तापमान वाढल्यानंतर लोकांच्या मानसिक आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. उष्ण दिवसांमध्ये लोक आळसावल्याचे तसेच त्यांच्या वागण्यात अनिश्चितता आल्याचे दिसते. उष्णता वाढल्यावर  अमेरिका आणि मेक्सीकोमध्ये नैराश्य व्यक्त करणाऱ्या ट्वीट्समध्ये वाढ होते तसेच आत्महत्यांमध्ये वाढ होते असे निरीक्षण स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी नोंदवले होते. एमआयटी आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासामध्ये अमेरिकेतील २० लाख लोकांच्या मानसिक आरोग्यातील बदल व तापमान यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला तसेच जवळजवळ एका दशकभराच्या नोंदीचीही माहिती घेण्यात आली. तापमानात वाढ किती काळ झाली हे महत्त्वाचे नाही तर तापमानवाढीमुळे मानसिक आरोग्य तक्रारी लक्षणीय वाढल्या हे लक्षात आल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. २००५ साली हरिकेन वादळ आलेल्या लोकांच्या मानसिक तक्रारींमध्ये इतर सुरक्षित जागी राहाणाऱ्या लोकांच्या तक्रारींपेक्षा ४ टक्क्यांनी वाढ झाली होती.  तसेच ३० अंशांपेक्षा तापमान वाढल्यानंतर मानसिक आरोग्य बिघडण्याच्या संख्येत १ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसून आले. पावसामुळेही मानसिक आरोग्य वाढल्याचे दिसले. महिन्यातील २५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस पडल्यास मानसिक आरोग्य बिघडण्यामध्ये २ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. 

टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय