शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अन्नपदार्थांना द्या मुलांचं प्रेम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:53 IST

तीही तुमचं आयुष्य समृद्ध करतील..

ठळक मुद्देअन्नपदार्थांबरोबर तुम्हीही जगा. त्या त्या पदार्थाची चव, रंग, स्पर्श, आकार या सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवा.जे लोक अशा पद्धतीनं अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात, त्यांचं आयुष्यही तुलनेनं सुखी असतं.तुलनेनं ही मंडळी उत्साही, तत्पर आणि कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरी जाणारी, त्यांना भिडणारी असतात..

- मयूर पठाडेरोज आपण जेवण करतो. अगदी रोज. उपासतापासाच्या दिवशीचं जाऊ द्या, पण दिवसांतून किमान दोनदा आपण जेवण करतो. त्याशिवाय बºयाचदा नाश्ता किंवा इतर वेळीही आपण काही ना काही तोंडात टाकत असतो.आपल्या लक्षात येते किंवा लक्षात राहाते ती केवळ त्या त्या पदार्थाची चव. पण हा पदार्थ आपण कधी जगला आहे?तुम्ही म्हणाल, पदार्थ जगायचा म्हणजे काय करायचं?काही नाही, लहान मूल, त्यातही ते तान्हं मूल असेल, तर त्याकडे आपण किती बारकाईनं लक्ष देतो. त्याला काय हवं, नको, त्याला काही होतंय काए त्याची खाण्यापिण्याची वेळ, त्याला वेळच्या वेळी द्यायच्या लस, त्याची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही, वेळच्या वेळी सारे नैसर्गिक विधि त्याला होताहेत की नाही, योग्य वेळी ते पालथं पडतंय का, रांगतंय का?.. एक ना अनेक अशा हजार गोष्टी.. मुलाबरोबरचे ते सारे क्षण आपण जगत असतो. आपल्या आनंदाचा आणि आयुष्याचा तो एक भाग असतो..आपल्या जेवणाच्या बाबतीतही तेच आहे. म्हणजे जे पदार्थ आपण खातो, ते किती आवडीनं खातो. त्या पदार्थाचं रंग, रुप, ठेवण, त्याचा स्पर्श.. यातलं आपण काय काय अनुभवतो? खरं तर काहीच नाही. अनेकदा तर आपण समरसून त्याची चवही घेत नाही.. खाल्लंच पाहिजे म्हणून आपण अनेक गोष्टी पोटात ढकलत असतो. त्याची सवय झाली म्हणूनही अनेकदा आपण तोंडात काहीही ना काही सरकवत असतो.. पण अभ्यासकांचं म्हणणं आहे, त्या अन्नपदार्थांबरोबर तुम्हीही जगा. त्या त्या पदार्थाची चव, रंग, स्पर्श, आकार या सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवा. हा अनुभव तुमचं केवळ पोषणच करणार नाही, तर एक अपूर्व असा आनंद तुम्हाला देऊन जाईल..जे लोक अशा पद्धतीनं अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात, त्यांचं आयुष्यही तुलनेनं सुखी असतं, ताणतणावांपासून अशा व्यक्ती बºयाच दूर असतात. म्हणजे त्यांना काहीच टेन्शन्स नसतात, असं नाही, पण ही अन्नदेवता त्यांची ही सारी टेन्शन्स आपोआप कमी करते. तुलनेनं ही मंडळी उत्साही, तत्पर आणि कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरी जाणारी आणि त्यांना भिडणारी असतात, असं निरीक्षण आहे.खरंतर आपल्या पूर्वजांनी आणि वाडवडिलांनी हेच सांगून ठेवलं आहे. आजीबाईच्या बटव्यातीलच ही गोष्ट. ती पुन्हा अनुभवायला काय हरकत आहे?