शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हाताच्या तळव्यांना वारंवार घाम येतोय? 'या' आजाराची शक्यता असू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:30 IST

हात आणि पायांच्या तळव्यांना घाम येणे योग्य नाही. या अशा व्यक्तिंना मानसिक आजार,  ताणतणाव असण्याचे प्राथ

मुंबई : काही व्यक्तिंना कोणत्याही प्रकारची  शारीरिक हालचाल न करता  हातांच्या किंवा पायांच्या तळव्यांना घाम येतो. विशेष म्हणजे हा घाम पुसल्याने तो काही थांबत नाही. त्या व्यक्तीच्या तळव्यांना वारंवार घाम येतो. मात्र, या व्यक्तिंना काही आरोग्याच्या समस्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घाम येणे थांबत नसेल तर त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. काही लक्षणांमुळे हा घाम येत असेल तर त्यावर उपचार करून हा घाम थांबविणे शक्य असते. कारण, कुठल्याही आरोग्याच्या समस्यांशिवाय हा घाम येत असेल तर त्या व्यक्तिला  हायपरहायड्रोसिस या आजाराची समस्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

वारंवार घाम येणे योग्य नव्हे हात आणि पायांच्या तळव्यांना घाम येणे योग्य नाही. या अशा व्यक्तिंना मानसिक आजार,  ताणतणाव असण्याचे प्राथमिक कारण असते. काही वेळा मधुमेह, थायरॉईडमुळेही वारंवार घाम येतो. 

काय काळजी घ्याल? समस्या गंभीर असेल तर वैद्यकीय सल्ला घेऊन रक्ताच्या काही चाचण्या करून घेणे आवश्यक ठरते. हायपरहायड्रोसिसचे निदान केले असेल तर शरीरातील ग्रंथी अधिक  सक्रिय होतात.

...हा तर हायपरहायड्रोसिस आजारकाही व्यक्तिंना आरोग्याच्या कोणत्याही व्याधी नसतात. तरीही त्यांच्या तळव्यांना घाम सातत्याने येतो.  तीनही ऋतूत त्यांना हा त्रास होतो. अशावेळी वैद्यकीय सल्ल्याने या आजाराचे निदान करून घ्यावे. त्यामुळे काही वेळा हायपरहायड्रोसिस आजार असण्याची शक्यता असते. यामध्ये काहीवेळा रक्तवाहिन्या अधिक सक्रिय होतात.

हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना घाम येण्याची विविध कारणे असू शकतात. हायपरहायड्रोसिस नावाचा आजार असू शकतो. मात्र, त्याचे योग्य निदान डॉक्टरांकडून करून घेणे अपेक्षित असते. काही वेळा मानसिक ताणतणावमुळेही अशा पद्धतीची लक्षणे दिसू शकतात. काहीवेळा  मधुमेह, थायरॉइडमुळेसुद्धा हे आजार होऊ शकतात. शरीरातील ग्रंथी अतिक्रियाशील होतात, त्यावेळी असा त्रास होतो. या अशावेळी अतिक्रियाशील ग्रंथी सर्जरी करून हे थांबविता येते.  - डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यक शास्त्र, सेंट जॉर्जेस रुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्य