शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

निरोगी फुफ्फुसांसाठी या पदार्थांचं करा सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 11:38 IST

चुकीच्या आहारामुळे आणि हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसांसंबधी वेगवेगळे आजार जसे की, टीबी, अस्थमा, फुफ्फुसांचा कॅन्सर हे होऊ शकतात.

फुफ्फुसे आपल्या शरीराचं महत्त्वपूर्ण अंग आहे. याव्दारे आपण श्वास घेतो. फुफ्फुसांचं काम वातावरणातून ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. हे ऑक्सिजन रक्ताव्दारे हृदयापर्यंत पोहोचतं. त्यामुळे फुफ्फुसांची काळजी घेणे गरजेचं आहे. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा प्रभाव फुफ्फुसांवर पडतो. चुकीच्या आहारामुळे आणि हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसांसंबधी वेगवेगळे आजार जसे की, टीबी, अस्थमा, फुफ्फुसांचा कॅन्सर हे होऊ शकतात. पण काही गोष्टींची आधीच काळजी घेतली तर या समस्या रोखल्या जाऊ शकतात.

व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ

फुफ्फुसांसाठी व्हिटॅमिन सी फार फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी एकप्रकार चं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे जे श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन शरीराच्या सर्वच अंगांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतं. सर्वच आंबट फळांमद्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे संत्री, लिंबू, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, अननस आणि कैरी ही फळे भरपूर खावीत. व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. 

लायकोपेन असलेला आहार

फुफ्फूसांसाठी लायकोपेनयुक्त आहार करणे फायदेशीर ठरतं. कारण या आहारामध्ये कॅरोटीनॉयड असतं. हे एकप्रकार असं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे जे अस्थमापासून बचाव करतं. आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोकाही कमी होतो. लायकोपेन मिळवण्यासाठी टोमॅटो, गाजर, कलिंगड, पपई तसेच हिरव्या भाज्या खाव्यात.

लसणानेही होतो फायदा

लसणाला कफनाशक मानलं जातं. जेवण केल्यानंतर लसणाचं सेवन केल्यास छाती चांगली राहते आणि अनेक रोगांपासून बचाव होतो. लसणामध्ये अॅलिसीन असते जे आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यासोबतच लसणामध्ये अनेक अॅटी-ऑक्सिडेंट्स असतात जे संक्रमणापासून बचाव करतात. तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अस्थमाच्या रुग्णांनी आहारात आवर्जून लसणाचा समावेश करावा.

मनुका

मनुक्याचे १५ दाणे रात्री पाण्यात भिजवा. सकाळी उठून ते मनुके खावे आणि ज्यात मनुके भिजवले होते ते पाणी प्यावे. एक महिना याने सेवन केल्यास फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं राहतं. 

तुळशीची पाने

तुळशीची पाने, काथ, कापूर  आणि वेलची समान प्रमाणात घेऊन त्यात थोडी साखर घालून मिश्रण बारीक करा. हे मिश्रण दिवसातून दोनदा थोडं खावे. याने फुफ्फुसात जमा झालेला कफ मोकळा होईल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य