शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! कोरोनानंतर आता आणखी एक संकट; मेंदू खाणाऱ्या 'अमिबा'चा धोका, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 10:08 IST

रोजच्या प्रमाणेच नळाच्या पाण्याने नाक साफ केले. परंतु त्याने त्या दिवशी यासाठी पाणी न उकळताच घेतले होते. या पाण्यातूनच त्याला नेग्लेरिया फाउलेरी या अमिबाची लागण झाली.

शरीरात शिरलेल्या अमिबामुळे अमेरिकेत एका व्यक्तीचा मागच्या आठवड्यात बळी गेला. या व्यक्तीला दुर्मीळ आजार झाला होता. पुढे आजार विकोपाला गेला आणि उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा प्रकार फ्लोरिडातील शार्लोट काऊंटीमध्ये घडला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याने फ्लोरिडाच्या आरोग्य विभागाने अद्याप त्या व्यक्तीचे नाव जाहीर केलेले नाही. 

नेमके काय झाले? 

या व्यक्तीने रोजच्या प्रमाणेच नळाच्या पाण्याने नाक साफ केले. परंतु त्याने त्या दिवशी यासाठी पाणी न उकळताच घेतले होते. या पाण्यातूनच त्याला नेग्लेरिया फाउलेरी या अमिबाची लागण झाली. नाकावाटे शिरकाव केलेला हा जीव नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो. हा जीव मेंदूत गेला की, माणसाला प्रायमरी अमेबिक मेनिंगोएन्सेफलायटिस-पीएएम हा आजार होतो. हा अमिबा मेंदूंच्या ऊती खाऊन नष्ट करतो. असे झाल्यास सामान्यपणे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. त्यावर डॉक्टरांना अद्याप उपाय करता आलेला नाही.

आतापर्यंत किती जणांचे बळी? 

- हा एकपेशीय जीव सामान्यपणे तलाव, नदीमध्ये आढळतो. अशा ठिकाणी पोहणारे, डुबकी घेणाऱ्यांना याची लागण होण्याची भीती असते. परंतु हा जीव नळावाटे येणाऱ्या पाण्यात आढळल्याचे पुरावे नाहीत. - १९६० पासून आतापर्यंत या आजाराचे एकूण १५७ रुग्ण आढळले आहेत. यातील १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.- बहुतांश रुग्ण दक्षिण अमेरिकेतील राज्यांमध्ये आढळले आहेत. टेक्सासमध्ये ३९ तर फ्लोरिडामध्ये ३८ जण आढळले आहेत. - अमिबा सामान्यपणे उष्ण ठिकाणी व उबदार पाण्यात आढळतो. परंतु अलीकडे काही रुग्ण उत्तरेकडील राज्यांमध्येही आढळले आहेत.

बाधा झाल्याची काय आहेत लक्षणे?

नाकावाटे अमिबाने शरीरात शिरकाव केल्यानंतर पुढच्या १२ दिवसात त्या व्यक्तीला ताप येऊ लागतो.डोके दुखू लागते. उलट्या होऊ लागतात. मान आखडू लागते, स्मृतिभ्रंश होऊ लागतो.मज्जासंस्थेशी संबंधित अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :AmericaअमेरिकाHealthआरोग्य