शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अळशी म्हणजे गुणधर्मांचा खजिना; वजन तर कमी होतेच पण त्याहीपेक्षा आहेत मोठे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 14:44 IST

अळशीचे फायदे मोजावे तितकेच कमी. त्यामुळे अळशी खा आणि तंदरुस्त राहा. जाणून घेऊया अळशी किती फायदेशीर आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी विशेष फायद्याच्या आहेत. त्यांच्यातील गुणात्मक घटकांमुळे आपण त्यांचे सेवन करणे कधीही योग्य आहे. त्यापैकीच एक म्हणजे अळशी. अळशीचे फायदे मोजावे तितकेच कमी. त्यामुळे अळशी खा आणि तंदरुस्त राहा. जाणून घेऊया अळशी किती फायदेशीर आहे.

वजन कमी करणेअळशीचा वजन कमी करण्यासाठी विशेष फायदा होतो. अळशीत प्रोटीन भरपूर प्रमाणात असते आणि वजन कमी कमी करण्यासाठी प्रोटीनची खुप आवश्यकता असते. अळशीच्या १०० ग्रॅम बीजांमध्ये १८ ग्रॅम प्रोटीन असते. यात म्युसिलेज नावाचे फायबर असते. ज्यामुळे भूक मी लागते. तसेच आपल्याला खाद्यपदार्थांच्या ज्या काही क्रेविंग होतात त्याही कमी होतात. अनेक संशोधनात हे सिद्ध झालेले आहे की अळशीची पावडर खाल्ल्याने मोठ्याप्रमाणात वजन कमी होते.

अळशीच्या सेवनाचे आणखी फायदेअळशीमध्ये ओमेगा३ फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य राखण्यासाठी याचा बराच फायदा होतो. अळशीमध्ये बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठीही अळशीचा उपयोग होतो.

अळशीचे योग्य पद्धतीने सेवनअळशीच्या सेवनाचे फायदे पाहता प्रत्येकाने अळशीचे सेवन केले पाहिजे. मात्र ते योग्यरितीने करणे गरजेचे आहे. कसे ते पहा...साहित्य-एक मोठा चमचा अळशीची पावडरएक ग्लास पाणीएक चमचा लिंबाचा रसएक चमचा गुळकृती-अळशीचे सेवन करण्यासाठी प्रथम पाणी उकळून घ्या. त्यात अळशीची पावडर घाला. त्यात लिंबाचा रस आणि गुळ टाका.अनेक लोकांना माहितही नसेल की अळशी दोन प्रकारची असते एक गडद चॉकलेटी आणि एक पिवळी. दोघांमध्ये सारखेच गुणधर्म असतात. तुम्ही अळशी भाजून घेऊ शकता किंवा त्याची पावडर करू शकता. लक्षात ठेवा ही पावडर हवाबंद डब्यातच ठेवा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न