शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाच तास झोप हवीच, अन्यथा ओढवतील संकटे! ५० वर्षे व त्यापुढील वयाच्या लोकांना मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 07:14 IST

ब्रिटनमधील एका संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात असून त्यावर आधारित एक लेख प्लोस मेडिसिन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

लंडन :  ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी रोज रात्री ५ तासांपेक्षा कमी झोप घेतली तर त्यांना  मधुमेह, विविध प्रकारचे कॅन्सर, हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, फुफ्फुसांचे विकार, किडनी, यकृताचा आजार, असे गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. ब्रिटनमधील एका संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात असून त्यावर आधारित एक लेख प्लोस मेडिसिन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

या संशोधनामध्ये ब्रिटनमधील ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. ते रोज रात्री ५ तासांपेक्षा कमी झोप घेतात व त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर काय परिणाम झाले याचे निरीक्षण सुमारे २५ वर्षे करण्यात आले. इतका प्रदीर्घ काळ केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.

हे आजार होण्याची शक्यतारोज रात्री ५ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना मधुमेह, विविध प्रकारचे कॅन्सर, हृदरोग, हृदयविकाराचा झटका, फुफ्फुसांचे विकार, किडनी, यकृताचा आजार, नैराश्य, विस्मरण, पार्किन्सन, संधिवात व काही मानसिक विकार यापैकी कोणताही आजार होऊ शकतो.

किती तास झोप आवश्यक?ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनातील एक शास्त्रज्ञ डॉ. सेव्हरिन सेबिया यांनी सांगितले की, माणसाचे वय वाढते तसतसे त्याच्या झोपेच्या चक्राचे स्वरूप बदलते. जर गंभीर आजार होण्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर रोज रात्री किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. झोपण्याच्या आधी काहीही खाणे टाळावे व मोबाइल फोन, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर राहावे असेही त्यांनी सांगितले.

३०% शक्यता ५० वर्षांपेेक्षा कमी वयाच्या ज्या लोकांनी रोज रात्री ५ तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतली त्यांना गंभीर आजार होण्याची  आहे. 

nअशीच जीवनशैली असलेल्या ६० वर्षे वयावरील व ७० वर्षे वयाच्या लोकांमध्ये दुर्धर आजार होण्याचा धोका अनुक्रमे ३२ व ४०% आहे. पुरेशी झोप न घेतल्यामुळे रोगग्रस्त होऊन २५% लोक मरण पावतात. 

टॅग्स :Healthआरोग्य