शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

​Fitness : ‘सिक्स पॅक्स’ अ‍ॅब्स बनविण्यासाठी हे आहेत सोपे एक्झरसाइज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 15:57 IST

आजची तरूणाईदेखील सेलिब्रिटींचे अनुकरण करून ‘सिक्स पॅक्स’ अ‍ॅब्स बनविण्याचा खूपच प्रयत्न करतात, मात्र यात काहीचजणच यशस्वी होतात.

बॉलिवूड सेलिब्रिटींसारखी स्लिम आणि फिट बॉडी कोणाला आवडणार नाही. त्यातच सिक्स पॅक्स अ‍ॅब्सची भर पडली तर अधिक उत्तम. सेलिब्रिटींमध्ये सिक्स पॅक्स अ‍ॅब्स बनविण्याची जणू क्रेझच निर्माण झाली आहे. आजची तरूणाईदेखील त्यांचे अनुकरण करून तसे बनविण्याचा खूपच प्रयत्न करतात, मात्र यात काहीचजणच यशस्वी होतात. जर आपणही आपला लठ्ठपणा कमी करून सिक्स पॅक बनविण्याच्या प्रयत्नात आहात तर काही ठराविक एक्झरसाइजचे प्रकार केलेत तर नक्कीच यशस्वी व्हाल.  चला जाणून घेऊया त्या एक्झरसाइजबाबत...* सायकलिंगअ‍ॅब्स बनविण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे सायकलिंग होय. मात्र यासाठी सायकलवरच सायकलिंग करणे आवश्यक नाही. विना सायकलचेही आपण सायकलिंगच्या मूव्हमेंट करु शकता.  * व्हर्टिकल लेग क्रंच व्हर्टिकल लेग क्रंचमुळे शरीराला लवचिकता तर येते सोबतच अ‍ॅब्स बनविण्यासाठीसुद्धा मदत होते. यासाठी चटईवर पाठीच्या बाजूने झोपावे आणि पायांना वर उचलावे. जेणे करुन ९० डिग्रीचा कोन तयार होईल. त्यानंतर डोक्याला हातांच्या साह्याने आधार द्यावा. आता छातीने पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. अशा पोजिशन १२ ते १६ वेळा तीन सेट्समध्ये कराव्या.  * हील क्रंचहील क्रंच पारंपरिक क्रंचसारखा दिसतो, मात्र त्यापेक्षा जास्त परिणामकारक आहे. हील क्रंच करण्यासाठी पाठीवर झोपून पायांना जवळ घ्या. मात्र या दरम्यान पायांचे तळवे जमिनीला स्पर्शून असावेत. त्यांनतर दोन्ही हातांना क्रॉस करुन डोक्याखाली घ्यावेत. शरीराचा खालचा भाग टाचांवर असावा आणि पंचे वर उचलावे. आता शरीराचा वरचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करा. असे १२ ते १६ वेळेस करावे. * प्लॅँक एक्झरसाइज प्लॅँक एक्झरसाइनने अ‍ॅब्स तर बनतातच शिवाय मांसपेशीदेखील मजबूत होण्यास मदत होते. हा एक्झरसाइज कमरेसाठीदेखील उपयुक्त आहे. हा एक्झरसाइज करताना पोटाच्या बाजूने चटईवर झोपावे. डोक्याचा जमिनीला स्पर्श करावा. आता शरीराचा वरचा भाग कोपऱ्यांवर घेऊन कोपरे जमिनीवर टेकून पायांनाही पंज्यांवर टेकावेत. आता आपले पोट व मांड्यांना वरती उचलण्याचा प्रयत्न करावा. अशा पोजिशनमध्ये २० ते ३० सेकंदापर्यंत थांबावे आणि त्यानंतर साधारण पोजिशनमध्ये यावे. असे दोन ते तीनदा करावे.  वरील सोप्या एक्झरसाइजच्या माध्यमातून आपले सिक्स पॅक्स अ‍ॅब्स बनण्यास मदत होईल. source : amarujalaAlso Read : ​​Six Pack बनविण्यासाठी आहाराची अशी घ्या काळजी !                   : ​OMG : ​‘या’ ७ वर्षीय बालकाचे आहेत ‘8 pack abs’ !