शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Fitness : काय सेवन करुन एवढे फिट राहतात आपले लाडके स्टार्स, जाणून घ्या संपूर्ण डायट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 15:34 IST

चला जाणून घेऊया अक्षय कुमारपासून दीपिका पादुकोणपर्यंत...काय आहे त्यांचे फिटनेस रहस्य.

बॉलिवूड स्टार्ससाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे त्यांचे फिटनेस. यासाठी ते योगा, जिमचा आधार तर घेतातच. सोबतच संतुलित आहाराचा डायट प्लॅनही ते आवर्जून फॉलो करतात. चला जाणून घेऊया अक्षय कुमारपासून दीपिका पादुकोणपर्यंत...काय आहे त्यांचे फिटनेस रहस्य.  * अक्षय कुमार बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या फिटनेस संदर्भात खूपच सतर्क राहतो. सिगारेट, मद्यपान आणि पार्ट्यांपासून दूर राहणारा अक्षय कुमार आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजेपासून करतो. योगा आणि व्यायामाशिवाय अक्षय संतुलित आहारदेखील घेतो.  अक्षय नाश्त्यात पराठ्यांसोबत एक ग्लास दूध घेतो. दुपारच्या जेवणात दाळ, चपाती, भाजी आणि दही घेतो आणि रात्रीच्या जेवणात हिरवा भाजीपाला आणि सूप घेत असतो.  * आलिया भट्ट बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या याच अंदाजाबरोबर स्लिम बॉडीसाठीदेखील ओळखली जाते. ती आपल्या फिटनेसवर खूपच लक्ष देत आहे. ती आठवड्याचे तीन दिवसच काम करते आणि एक दिवस आराम.ती नाश्त्यात पोहा किंवा भाज्यांचे सेवन करते. दुपारच्या जेवणाअगोदर ती काही फळांसोबत इडली सांबर खाते. तिच्या दुपारच्या जेवणात साधारण दाळ, चपाती आणि भाजी यांचा समावेश असतो. संध्याकाळी इडली सोबत चहा किंवा कॉफी घेणे पसंत करते. रात्रीच्या जेवणात दाळ किंवा भाजी आणि चिकनसोबत एक चपाती सेवन करते.* रणवीर सिंह अभिनेता रणवीर सिंहदेखील फिट असून त्यासाठी तो दिवसातून दोनदा व्यायाम करतो. शिवाय योग्य डायट फॉलो करतो.  सकाळी नाश्त्यात अंड्याचा सफेद बलक, चपाती आणि केळी सेवन करतो. तो प्रोटीनयुक्त भरपूर आहार घेतो, सोबतच नियमितपणे प्रत्येक तीन तासानंतर जेवण करतो. दरम्यान सुकामेवाचेही सेवन करतो. यामुळे त्याच्या शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. दुपारच्या जेवणात मासे व भाजीपाला घेतो आणि रात्री प्रोटीन शेक आणि कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेतो.  * प्रियांका चोप्राबॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांकाची ओळख आज हॉट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून निर्माण झाली आहे. प्रियांका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा आणि व्यायामाला महत्त्व तर देतेच पण तिच्या डायटमध्ये हिरव्या भाजीपाला आणि फळांचा आवर्जून समावेश असतो. ती सकाळी एक ग्लास स्किम्ड दूधासोबत दोन अंडी घेते. दुपारच्या जेवणात दाळ आणि भाजीसोबत दोन चपाती घेते. संध्याकाळी तुर्की सॅँडविच किंवा अंकुरित कडधान्यासोबत कोशिंबिर आणि रात्रीच्या जेवणात फ्र ाय भाज्यांसोबत भाज्यांचा सूप आणि ग्रील्ड चिकन घेते. * दीपिका पादुकोण दीपिका आपला फिटनेस टिकविण्यासाठी नियमित व्यायाम करत असते. सोबतच संतुलित डायटदेखील फॉलो करते. सकाळी नाश्त्यात एक ग्लास दूधसोबत दोन अंडे, दुपारच्या जेवणात ग्रील्ड मासे आणि त्यांच्या सोबत भाजीपाला तसेच जेवणादरम्यान ताजे फळ आणि फळांचा रस सेवन क रते. दीपिका दक्षिण भारतीय असल्याने तेथील खाद्यपदार्थ तिला खूप आवडतात. ती विना बटाट्यांचा डोसा आणि हिरव्या चटणी ऐवजी नारळची चटणी घेणे पसंत करते. तिच्या रात्रीच्या जेवणात भाज्यांसोबत चपाटी आणि कोशिंबिर घेते. ती भाताचे सेवन शक्यतो टाळते.   Also Read : Fitness : 'फिट अ‍ॅण्ड फाइन' राहायचे असेल तर हे नक्की वाचा !                   : HEALTH : वजन कमी करण्यासाठी हा आहे खास शाकाहारी डायट प्लॅन !