शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

Fitness : फिटनेससाठी सेलिब्रिटी सेवन करतात ‘हे’ विटॅमिनयुक्त पदार्थ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 15:13 IST

ज्या आहारात जास्त प्रोटीन्स, विटॅमिन्स मिळतील अशा पदार्थांचा त्यांच्या डायटमध्ये समावेश असतो. जाणून घेऊया की कोणत्या पदार्थांमध्ये जास्त विटॅमिन्स मिळतात ते.

-रवींद्र मोरे सेलिब्रिटी म्हटले म्हणजे, शुटिंगसाठी धावपळ, लांबचा प्रवास, व्यस्त दिनचर्या, कामाचा व्याप आदी गोष्टी आल्याच. या सर्व गोष्टी सांभाळून पुन्हा व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्याची जबाबदारी. हे सर्व करत असताना प्रत्येक सेलिब्रिटीचे आयुष्य म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावे लागेल. आपल्याला प्रश्न पडतो की, एवढा व्याप असुनही हे स्वत:ला फिट कसे ठेवतात? बहुतेक सेलिब्रिटी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिम, योगाबरोबरच आहाराला खूप महत्त्व देतात. विशेषत: ज्या आहारात जास्त प्रोटीन्स, विटॅमिन्स मिळतील अशा पदार्थांचा त्यांच्या डायटमध्ये समावेश असतो. आज जाणून घेऊया की कोणत्या पदार्थांमध्ये जास्त विटॅमिन्स मिळतात ते.  * गाजरडोळ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सेलिब्रिटी नेहमी गाजरचे सेवन करतात. कारण गाजरमध्ये बीटा कॅरोटीनची मात्रा अधिक असते आणि ती शरीरात गेल्यानंतर विटॅमिन ए मध्ये रुपांतरित होते. विटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. सोबतच त्वचेच्या सौंदर्यासाठीही खूप फायदेशीर आहे. शिवाय गाजरच्या सेवनाने दातांना किडदेखील लागत नाही.* दही दहीमध्ये विटॅमिन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. यामुळे लाल रक्तपेशींची निर्मिती होण्यास मदत होते. कामाचा व्याप, व्यस्त आयुष्य त्यामुळे वेळेवर जेवण नसते त्यामुळे बऱ्याच  सेलिब्रिटींना विटॅमिन्सच्या कमतरतेने शरीरात कमजोरी येते ज्यामुळे थकवा जाणवतो आणि भूकदेखील लागत नाही. यामुळे ते विटॅमिन्स मिळण्यासाठी रोज विना फ्लेवर ताज्या दहीचे सेवन करतात.  * बादाम प्रत्येक सेलिब्रिटी ड्रायफूडला महत्त्व देतात, त्यात बादामचे सेवन आवर्जून करतात. कारण यात विटॅमिन इ शरीरात फॅट सोल्यूबल अ‍ॅन्टि-आॅक्सीडेंट प्रमाणे काम करते. विशेषत: बादामाचे सेवन ते सालीसह करतात, कारण यामुळे शरीराला सर्व पोषक तत्त्व सहज मिळतात. याशिवाय बादामध्ये बादाममध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाणही अधिक असते.  * ब्रोकोली ब्रोकोलीमध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन के अधिक प्रमाणात असते. हे विटॅमिन शरीरासाठी आवश्यक असल्याने प्रत्येक सेलिब्रिटी ब्रोकोलीचे सेवन करतात. विटॅमिन के फॅट सोल्यूबल विटॅमिन आहे ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त विटॅमिन सी शरीराच्या पेशी आणि आतड्यांच्या वाढीसाठी मदत करते. यामुळे सेलिब्रिटी याचे सेवन एकतर भाजी बनवून नाहीतर सलादमध्ये टाकून करतात. * अंडे शरीराला फिट ठेवण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते, यासाठी सेलेब्स नास्त्यामध्ये अंड्याचे सेवन आवर्जून करतात. अंडे प्रोटीनचे मुख्य स्त्रोत मानले जाते, मात्र विटॅमिन आणि मिनरल्सचे प्रमाणही अंड्यामध्ये अधिक आहे. अंड्यातील पांढरा आणि पिवळा असे दोन्ही भाग आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी सेलेब्सना जिम ट्रेनर उकडलेली अंडी खाण्याचा सल्ला देतात. याचे नियमित सेवन केल्याने त्यांच्या मेटॅबोलिज्म रेटदेखील चांगला बनतो. * पपईइतर फळांच्या तुलनेने पपईमध्ये विटॅमिन सी चे प्रमाण सर्वाधिक असल्याने प्रत्येक सेलेब्स याचे सेवन करतात. यात ग्लायसेमिक इंडेक्सदेखील कमी असतो. यासाठी जे सेलेब्स मधुमेहाने त्रस्त आहेत आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे ते रोज पपईचे सेवन करतात.   * लिंबूलिंबूमध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. यासाठी बहुतेक सर्वच सेलेब्स लिंबूचे सेवन करतात. थोडासाही थकवा जाणवल्यास लिंबू पाणी घेतात. यातील अ‍ॅन्टि-आॅक्सिडेंट त्यांना बाहेरील संक्रमणापासून वाचविण्यास मदत करते शिवाय पचनसंस्थादेखील सुधारते. बहुतेक सेलेब्स वजन कमी करण्यासाठी लिंबूचे सेवन करतात. * पालकशरीराला विटॅमिन इ, पोटॅशियम, मॅग्निशियम आणि फायबर मिळण्यासाठी सेलेब्स पालकचे सेवन आवर्जून करतात. पालकमध्ये विटॅमिन इ चे प्रमाण इतर हिरव्या भाजीपाल्याच्या तुलनेने सर्वाधिक आहे. यामुळे सेलेब्स पालक सुपला जास्त पसंती देतात. * चिकनबरेच सेलेब्स फिट राहण्यासाठी चिकनवर ताव मारताना दिसतात. कारण यात विटॅमिन बी-६ चे प्रमाण खूप जास्त आहे आणि बी-६ वाटर सोल्यूबल विटॅमिन आहे जे रोगप्रतिकार शक्तीला सुदृढ बनविण्यास मदत करते तसेच यामुळे शरीराचे इतर अवयवही चांगले काम करतात. Also Read : ​विटॅमिन ‘डी’चा अभाव ! आजाराला आमंत्रण !!