शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वगुणधर्मांनी उपयुक्त, आजपासूनच करा आहारात मेथीचा समावेश, कसा ते जाणून घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2022 11:41 IST

थंडी सुरु झाली की आहारात बदल आपोआपच होतो. थंड पदार्थ बाजूला होतात आणि गरम पदार्थच खायची इच्छा होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार हिवाळ्यात मेथी खूप फायदेशीर ठरते.

थंडी सुरु झाली की आहारात बदल आपोआपच होतो. थंड पदार्थ बाजूला होतात आणि गरम पदार्थच खायची इच्छा होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार हिवाळ्यात मेथी खूप फायदेशीर ठरते. मेथी मुळात उष्ण आणि चवीला कडवट असल्याने आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहे. मेथीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि महत्वाचे म्हणजे लोह मुबलक प्रमाणात आढळते. बहुतांश लोकांमध्ये लोहाची कमतरता जाणवते, विशेषत: महिलांमध्ये लोहाचे प्रमाण कमी असते. यासाठी मेथीचे सेवन फायदेशीर आहे. वेगवेगळ्या माध्यमातून करा मेथीचे सेवन १ किंवा २  चमचे मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी उठल्यावर त्याचे पाणी रिकाम्यापोटी पिणे.

मेथीची भाजी, ज्यूस किंवा पराठे हिवाळ्यात आपल्या डाएटमध्ये अवश्य असावेत.

मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी मेथीच्या दाण्यांची पावडर नियमित खावीमेथीचे नेमके फायदे कायपचनसंस्था सुधारण्यास मदत

दररोजच्या थकाथकीच्या जीवनात अनेकांना पचनाचा त्रास जाणवतो. त्यांच्यासाठी मेथी हा रामबाण उपाय आहे. मेथीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. मेथीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे पचनासाठी उपयुक्त आहे. 

मधुमेह आणि ब्लड प्रेशरवर नियंत्रण 

मधुमेही रुग्णांसाठी मेथी नक्कीच लाभदायक आहे. साखर आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखण्यासाठी मेथीची पावडर खावी, असा सल्ला वैद्यांनी देतात.

ब्लड प्रेशर आणि सतत थकवा येत असेल तर मेथीचे दाणे लाभदायक आहेत.

सर्दी खोकल्यापासून आराम

थंडीच्या दिवसांत सर्दी खोकला होणे स्वाभाविक असते. अशावेळी जास्त त्रास होऊ नये म्हणून मेथीचा आहारात समावेश करणे योग्य ठरते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स