शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

थकवा, सूज, ब्लडप्रेशर, असू शकतात किडनीच्या आजाराची लक्षणं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 11:39 IST

खालीलपैकी कोणत्याही लक्षणांचा अनुभव तुम्हाला आला तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे. 

डॉ. अश्वत्ती हरिदास 

मूत्रपिंड रोग, ज्याला वृक्क रोग असेही म्हणतात, मधुमेह, उच्च रक्तदान आणि अनुवांशिक घटकांसह विविध कारणांमुळे होऊ शकतो. मूत्रपिंडाच्या आजाराचे लवकर निदान ही यशस्वी उपचार आणि व्यवस्थापनाची गुरूकिल्ली आहे. या लेखात आपण मूत्रपिंडाच्या आजाराच्या लक्षणांची चर्चा करू.

मूत्रपिंड आजाराची लक्षणे:

सुरुवातीच्या टप्प्यात, मूत्रपिंड रोगाची सहज लक्षात येतील अशी लक्षणे नसू शकतात. मात्र, आजार जसा वाढतो तसे पुढील लक्षणे विकसित होऊ शकतात:

1.थकवा: थकवा हे मूत्रपिंड रोगाचे समान्य लक्षण आहे. जेव्हा मूत्रपिंड व्यवस्थित कार्य करीत नाहीत, शरीरात टाकाऊ पदार्थ जमा होऊ शकतात, त्यामुळे थकव्याची भावना निर्माण होते.

2.सूज: सूज, ज्याला शोफ सुद्ध म्हणतात, जेव्हा मूत्रपिंड नीट कार्य करीत नाही तेव्हा पाऊले, घोटे, पाय किंवा चेहर्‍यावर सूज येते. असे होण्याचे कारण म्हणजे शरीरातील द्रवाच्या संतुलनाच्या नियमानाचे कार्य मूत्रपिंड करतात.

3.लघवी क्रियेतील बदल: लघवी क्रियेतील बदल हे मूत्रपिंड रोगाचे लक्षण असू शकते. या बदलांमध्ये खालील्चा समावेश असू शकतो:

अधिक वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री

फार कमी वेळा लघवी होणे

लघवीला फेस किंवा बुडबुडे

लघवीत रक्त 

लघवी करण्यास त्रास

लघवी करताना वेदना किंवा जळजळ

4.उच्च रक्तदाब: उच्च रकतदाब हे मूत्रपिंड आजाराचे लक्षण असू शकते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मूत्रपिंडांची महत्त्वाची भूमिका असते आणि जेव्हा ते नीट काम करत नाही तेव्हा रक्तदाब वाढू शकतो.

5.मळमळ आणि उलटी: शरीरात जेव्हा टाकाऊ पदार्थ जमा होऊ लागता तेव्हा मळमळ आणि उलट्या होतात आणि मळमळण्याची भावना निर्माण होते.

6.खाज: शरीरात जेव्हा जास्तीचे टाकाऊ पदार्थ तयार होतात तेव्हा काज सुटू शकते आणि त्वचेचा क्षोभ होतो.

7.श्वास कमी पडणे: मूत्रपिंड रोगामुळे जेव्हा फुफ्फुसात द्रव जमा होते तेव्हा श्वास कमी पडतोय असे वाटू शकते.

8.कमी भूक: कमी भूक हे मूत्रपिंड आजाराचे लक्षण असू शकते. असे होण्याचे कारण म्हणजे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा होऊ शकतात आणि त्यामुळे मळमळ किंवा भूक न लागण्याची भावना निर्माण होते.

9.स्नायूंमध्ये गोळा येणे: मूत्रपिंड आजारामुळे जेव्हा शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते तेव्हा स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात. 

10.लक्ष केंद्रित करण्यास त्रास: शरीरात जेव्हा टाकाऊ पदार्थ जमा व्हायला लागतात आणि त्यामुळे थकवा किंवा गोंधळाची भावना निर्माण होते तेव्हा लक्ष केंद्रित करण्यास त्रास होऊ शकतो.

मूत्रपिंड आजार ही गंभीर स्थिती आहे आणि उपचार न केल्यास अनेक क्लिष्टता निर्माण होऊ शकतात. लवकर कळणे किंवा निदान होणे ही यशस्वी उपचार आणि व्यवस्थापनाची गुरूकिल्ली आहे. वरील यादीतील कोणत्याही लक्षणांचा अनुभव तुम्हाला आला तर तुमच्या डॉक्टरांशी बोलणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला मूत्रपिंड रोग आहे का हे निश्चित करण्यासाठी तुमचे डॉक्टर काही तपासण्या करुन घेऊ शकतात आणि तुम्हाला योग्य उपचार पर्यायांची शिफारस करू शकतात. परिपूर्ण आहार, सतत पाणी पिणे आणि दीर्घकालिक परिस्थितीचे व्यवस्थापन करणे अशी मूत्रपिंड आरोग्य राखण्यासाठी पावले उचलली तर मूत्रपिंड आजार आणि त्याच्या क्लिष्टता टाळण्यास मदत होऊ शकते.

(लेखक नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर आहेत)

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर