(Image Credit : Kiss My Keto)
उपवास करणे भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. तसे तर लोक धार्मिक मान्यतांमुळे उपवास करतात. पण उपवास करणे ही एक चांगल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठीची एक उत्तम प्रोसेस आहे. उपवास वजन कमी करण्यासाठीही प्रभावी उपाय मानला जातो. नियमित उपवास केल्याने वजन कमी होतं, हे वेगवेगळ्या रिसर्चमधूनही समोर आलं आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, रमजान दरम्यान उपवास केल्यास लठ्ठपणाही येत नाही आणि डायबिटीसचा धोकाही कमी होतो.
काय होतो फायदा?
या रिसर्चच्या माध्यमातून लठ्ठपणा यासंबंधी डायबिटीससारख्या इतर आजारांच्या उपचारासाठी एक नवीन दिशा मिळाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात लोक सकाळपासून ते सायंकाळपर्यंत पाणी सुद्धा सेवन करत नाहीत, त्यामुळे शुगर कंट्रोल करणाऱ्या प्रोटीन्सची निर्मिती भरपूर प्रमाणात होते.
कुणी केला रिसर्च?
या रिसर्चसाठी ह्यूस्टन येथील बेलॉर कॉलेज ऑफ मेडिसिनच्या अभ्यासकांनी उपवास ठेवण्याचे फायदे अभ्यासण्यासाठी रमजानच्या इस्लामिक आध्यात्मिक प्रॅक्टीसचा वापर केला. अभ्यासातून आढळलं की, लागोपाठ ३० दिवस रोजा किंवा उपवास केल्याने शरीरात काही विशेष प्रकारचे प्रोटीन्स निर्मित होतात, जे इन्सुलिन रेजिस्टेंस सुधारण्यात मदत करतात.
काय होतो फायदा?
इन्सुलिन रेजिस्टेंसच्या स्थितीमध्ये सेल्स म्हणजे पेशी प्रभावीपणे इन्सुलिनचा उपयोग करू शकत नाहीत. हे प्रोटीन जास्त चरबी आणि शुगर असलेल्या डाएटचे नकारात्मक प्रभावांपासून शरीराची रक्षा करतात. या रिसर्चसाठी अभ्यासकांनी १४ लोकांचा समावेश केला होता. या लोकांना रोज १५ तास सकाळपासून सायंकाळपर्यंत उपवास केला. दरम्यान त्यांनी काही खाल्लं किंवा प्यायलं नाही.
उपवास सुरू करण्यापूर्वी अभ्यासकांनी उपवासाच्या ४ आठवड्यानंतर आणि उपवास संपल्यानंतर १ आठवड्यांनी सहभागी लोकांचे ब्लड टेस्टसाठी सॅम्पल घेतले. ज्यात ट्रोपोमायोसिन (tropomyosin) TPM, 1, ३ आणि ४ चं अधिक प्रमाण आढळलं.
कसा होतो फायदा?
हे प्रोटीन केवळ स्केलेटल मसल्स आणि हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये मदत करतात असं नाही तर पेशींना सुद्धा सुरक्षा प्रदान करतात. जे इन्सुलिन रेजिस्टेंससाठी उपयोगी आहेत. अभ्यासकांनुसार, फीडिंग आणि उपवास ठेवल्याने शरीरात त्या प्रोटीनची निर्मिती कशी होते आणि वापर केला जातो, जे इन्सुलिन रेजिस्टेंससोबतच शरीराचं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फार गरजेचे आहेत. गेल्यावर्षी जून महिन्यातही एक रिसर्च समोर आला होता. ज्यात फास्टींगला वजन कमी करण्याचा प्रभावी उपाय सांगितलं.