शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कमी वयातच धुसर झाली असेल डोळ्यांची दृष्टी, चष्मा घालवण्यासाठी करा 'या' फळाचं सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:32 IST

How to boast eye sight : तुम्हाला जर लागलेला चष्मा दूर करायचा असेल किंवा चष्मा लागूच द्यायचा नसेल तर एका फळाचं नियमितपणे सेवन करा. याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी धुसर होणार नाही.

How to boast eye sight : आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच अनेकांच्या डोळ्यांची दृष्टी धुसर होऊ लागते. काहींना जवळचं बरोबर दिसत नाही तर काहींना दूरचं दिसत नाही. अशात कमी वयातच डोळ्यांवर चष्मा लावून फिरावं लागतं. मात्र, तुम्हाला जर लागलेला चष्मा दूर करायचा असेल किंवा चष्मा लागूच द्यायचा नसेल तर एका फळाचं नियमितपणे सेवन करा. याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी धुसर होणार नाही. हे फळ म्हणजे अक्रोड.

अक्रोडचं सेवन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. यात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि इतर अनेक पोषक तत्व असतात. जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. 

१) ओमेगा- ३ फॅटी अ‍ॅसिड 

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. जे डोळ्यांसाठी गरजेचं असतं. याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी अधिक चांगली होण्यास मदत मिळते.

२) अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स

अक्रोडमध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. जे डोळ्यांचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करण्याचं काम करतात.

३) व्हिटॅमिन ई

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा असतं, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तसेच मोतिबिंदू आणि वयानुसार डोळ्यांसंबंधी होणाऱ्या समस्या रोखण्यासही याने मदत मिळते.

४) ल्यूटिन आणि जॅक्सेंथिन

हे पिगमेंट्स डोळ्यांमध्ये आढळतात आणि उन्हापासून डोळ्यांची सुरक्षा करतात.

किती कराल सेवन?

अक्रोडचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करू शकता. दिवसातून किमान ४ ते ५ अक्रोड खावेत. हे तुम्ही दह्यासोबत किंवा सलादमधूनही खाऊ शकता. 

अक्रोडच्या नियमित सेवनाने तुमच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतं. मात्र, अक्रोड खाण्यासोबतच काही हेल्दी सवयी सुद्धा लावून घ्या. जसे की, पुरेशी झोप घेणे, स्क्रीन टाईम कमी करणे, डोळ्यांची नियमित स्वच्छता, बाहेर जाताना गॉगलचा वापर इत्यादी.

अक्रोड खाण्याचे इतर फायदे

- अक्रोडच्या नियमित सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. अशात तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते.

- अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला झोपही चांगली येते. याने चिंता आणि तणाव दूर करण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर अक्रोड त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतं.

टॅग्स :eye care tipsडोळ्यांची निगाHealth Tipsहेल्थ टिप्स