Liver transplant: सामान्यपणे कोणत्याही औषधांचे प्रयोग करायचे असेल तर सगळ्यात आधी हे प्रयोग उंदीर किंवा माकडांवर केले जातात. या दोन जीवांचा टेस्टींगसाठी सगळ्यात जास्त वापर केला जातो. पण आता टेक्नॉलॉजी आणि मेडिकल सायन्सनं इतरही काही प्राण्यांची क्लीनिकल ट्रायल सुरू केली आहे. लिव्हरच्या उपचारासाठी अमेरिकेच्या डॉक्टरांनी एका अशा प्राण्याची निवड केली ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.
लिव्हरच्या उपचारासाठी या प्राण्याचा अवयव वापरण्यासाठी अमेरिकेनं मंजुरी दिली आहे. वॉशिंग्टनमधून समोर आलेल्या माहितीनुसार, लिव्हरसंबंधी आजारांनी पीडित रूग्णांना या प्राण्याच्या लिव्हरनं आराम मिळेल.
अमेरिकन वैज्ञानिक लवकरच याबाबत प्रयोग करतील की, जीन्समध्ये बदल केलेल्या डुकराच्या लिव्हरच्या माध्यमातून त्या रूग्णांवर उपचार करता येईल का ज्यांच्या लिव्हरनं अचानक काम करणं बंद केलं.
ह्यूमन ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या क्षेत्रात रिसर्च करणारी कंपनी ‘ईजेनेसिस’ नुसार, या अशा पहिल्याच होणाऱ्या प्रयोगाला एफडीएकडून मंजुरी देण्यात आली आहे. एफडीएनं त्यांचे पार्टनर ‘ऑर्गनऑक्स’ सोबत मिळून याची घोषणा केली.
एका अंदाजानुसार अमेरिककेत दरवर्षी ३५ हजार लोक अचानक लिव्हरनं काम बंद केल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल होत असतात. लिव्हरच्या उपचारासाठी लिमिटेड पर्याय आहेत. या आजारामुळे होणारा मृत्यूदर ५० टक्के आहे. बऱ्याच लोकांना वेळीच ट्रान्सप्लांटसाठी लिव्हर मिळत नाही.
आता हा नवीन प्रयोग लवकरच सुरू होण्याची आशा आहे. प्राण्याचा अवयव मनुष्यात बसवण हा शोध खूप नवीन आणि क्रांतिकारी आहे. वैज्ञानिक डुकराचं लिव्हर रूग्णात फिट करणार नाही तर रिसर्चमध्ये सहभागी रूग्णाच्या शरीरात बाहेरून कनेक्ट करतील. लिव्हर हा असा एकमेव अवयव आहे जो पुन्हा तयार केला जाऊ शकतो.
मॅसाच्युसेट्स येथील ईजेनेसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी माइक कर्टिस म्हणाले की, चार मृतदेहांसोबत करण्यात आलेल्या प्रयोगातून असं आढळून आलं की, डुकराचं लिव्हर दोन किंवा तीन दिवसांपर्यंत मानवी लिव्हरचं कामकाज करण्यास मदत करू शकतं. या प्रयोगासाठी यात २० रूग्णांचा समावेश करण्यात येणार आहे.