शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

'या' आजार ज्याबाबत महिलांना पुसटशी कल्पनाही नसते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 12:50 IST

प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. अनेकदा मासिक पाळी दरम्यान प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. महिलांना मासिक पाळीमध्ये स्वतःची व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक असतं.

प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. अनेकदा मासिक पाळी दरम्यान प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. महिलांना मासिक पाळीमध्ये स्वतःची व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक असतं. अन्यथा शरीराला वेगवेगळ्या समस्यांसोबतच आजारांचाही सामना करावा लागू शकतो. असाच एक आजर म्हणजे,  एंडोमीट्रियोसिस. अनेक महिला या आजाराने ग्रस्त असतात. पण अनेकदा त्यांना याबाबत पुसटशी कल्पनाही नसते. 

एंडोमीट्रियोसिस असा आजार आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आसपासच्या पेशी आणि टिशू  संपूर्ण शरीरामध्ये पसरू लागतात. अनेकदा तर या पेशी आणि टिश्यूमुळे गाठी तयार होतात. 

भारतामध्ये या आजाराने पीडित महिलांची संख्या कोट्यावधीमध्ये आहे. हा आकडा त्या महिलांचा आहे, ज्यांना आपल्या आजाराबाबत सर्वकाही माहीत असून त्यावर त्या योग्य ते उपचार घेत आहेत. एंडोमिट्रियोसिस सोसायटी ऑफ इंडियाच्या आकड्यांनुसार, जवळपास 2.5 कोटी महिला या आजाराने ग्रस्त आहेत. 

एंडोमिट्रियोसिस आजार

गर्भाशयाच्या आजूबाजूच्या पेशी जेव्हा अंडाशय, पॅलोपियन ट्यूब, यूरीनरी ब्लॅडर किंवा पोटाच्या इतर भागांमध्ये पसरतात तेव्हा त्याला एंडोमिट्रियोसिस असं म्हणतात. सामान्यतः एंडोमिट्रियोसिस या आजाराची लक्षणं ही तरूणींमध्ये जास्त दिसून येतात. 

हेल्थ एक्सपर्टच्या सांगण्यानुसार, मोनोपॉजनंतर एंडोमिट्रियोसिसचा धोका कमी होत जातो. हा आजार मासिक पाळीशी निगडीत असून याची मोनोपॉजनंतर शक्यता कमी होते. 

एंडोमिट्रियोसिसची लक्षणं

  • मासिक पाळीमध्ये अनियमितता
  • मासिक पाळीमध्ये वेदना आणि अति रक्तस्त्राव
  • मासिक पाळी येण्याआधी ब्रेस्टला सूज येणं आणि थोड्या वेदनांचा सामना करणं
  • सतत होणारं यूरिन इन्फेक्शन 
  • पेल्विक एरियामध्ये वेदना होणं
  • थकवा, अस्वस्थता आणि चिडचिड होणं

 

एंडोमीट्रियोसिसवर उपचार 

द हेल्थ साइडने दिलेल्या वृत्तानुसार, तरूणींमध्ये जर या आजारांची लक्षणं दिसून आली तर डॉक्टर त्यांना लवकरात लवकर मातृत्व स्वीकारण्याचा सल्ला देतात. कारण हा आजार मासिक पाळीच्या संदर्भात असून महिला जेव्हा आई बनतात त्यावेळी 9 महिन्यांपर्यंत त्यांची मासिक पाळी येत नाही आणि त्यादरम्यान या पेशींचा विकास थांबतो. 

दरम्यान, हा उपाय एंडोमीट्रियोसिसच्या पहिल्या स्टेजपर्यंतच सफल होऊ शकतो. याचा अर्थ अजिबातच असा नाही की, आई बनल्यानंतर या समस्येपासून सुटका होते. 

तुम्हाला तुमच्या मासिक पाळीदरम्यान वरील लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेकदा हा आजार समजण्यासच वेळ लागतो. त्यामुळे या आजाराची लक्षणं जाणवल्यानंतर स्त्री रोग तज्ज्ञांऐवजी एंड्रोक्राइनोलॉजिस्टचा सल्ला घेणं उत्तम ठरतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWomenमहिलाPregnancyप्रेग्नंसी