हॉलिवूडच्या कितीतरी सिनेमांमध्ये आपण पाहिलंय की, कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीचा मेंदू एका चीपच्या माध्यमातून कंट्रोल केला जातो. पण ते सगळं काल्पनिक असतं. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आता प्रत्यक्षातही असं होताना बघायला मिळणार आहे. टेस्लाचे चीफ एक्झिक्युटीव्ह आणि स्पेस-एक्सचे संस्थापक एलन मस्क यांचं स्टार्टअप न्यूरोलिंक मनुष्याचा मेंदू वाचण्यासाठी आणि त्याला आजारावेळी नियंत्रित करण्यासाठी एका तंत्र विकसित करण्यावर काम करत आहेत. मस्क यांनी सांगितले की, यासंबंधी तंत्र आणि एक फ्लेक्सिबल चिप सादर केली जाईल. ही चीप मनुष्याच्या मेंदूमध्ये इम्प्लांट केली जाईल.
व्यक्तीचा मेंदू वाचू शकणार
एलन यांनी सांगितले की, या डिवाइसचा वापर व्यक्तीची स्मरणशक्ती वाढण्यासाठी, ब्रेन स्ट्रोक किंवा न्यूरोलॉजिकल रोगांनी ग्रस्त लोकांवर केला जाईल. त्यासोबतच लकवाग्रस्त रूग्णांसाठीही हे डिवाइस फायदेशीर ठरू शकतं. आम्ही रूग्णाचा मेंदू वाचू शकू आणि डेटा एकत्र करू शकू. न्यूरोलिंकने सांगितले की, आतापर्यंत या डिवाइसचा यशस्वी प्रयोग माकड आणि उंदरांवर करण्यात आला आहे.
ही चिप बारीक असून १ हजार तारांनी जोडलेली आहे. हे तार रूंदीला मनुष्यांच्या केसांच्या दहाव्या भागाच्या बरोबरीत आहेत. न्यूरोलिंककडून सांगण्यात आले की, हे तयार करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला.
हे डिवाइस रोबोटच्या माध्यमातून मेंदूमध्ये इन्टॉल केलं जाईल. सर्जन रोबोटच्या मदतीने व्यक्तीच्या डोक्यात २ मिलीमीटर छिद्र करतील. नंतर या छिद्रातून चिप मेंदूमध्ये लावली जाईल.
तार किंवा थ्रेड्सच्या इलेक्ट्रॉड्स न्यूरल स्पाइक्सला मॉनिटर करण्यात सक्षम असतील. हे इलेक्ट्रॉड्स ना केवळ मनुष्याच्या मेंदूला पूर्णपणे जाणू शकतील तर त्यांच्या वागण्यात येणारा चढ-उतारही जाणून घेऊ शकतील.
न्यूरोलिंकने सांगितले की, सर्वत पातळ्यांवर यशस्वी झाल्यावर २०२० च्या सुरूवातीला या डिवाइसचा प्रयोग मनुष्यावर एफडीएची मंजूरी मिळाल्यावर केला जाईल.
न्यूरालिंक टेक्नॉलॉजी मनुष्याच्या मेंदूमध्ये चिप आणि वायरच्या माध्यमातून काम करेल. ही चिप रिमूव्हेबल पॉडने लिंक्ड असेल, जे कानांच्या मागे फिट केले जातील. हे डिवाइस वायसलेसने दुसऱ्या डिवाइससोबत जोडले जाईल. याच्या माध्यमातून मेंदूच्या आतील माहिती थेट स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवर बघता येईल. अमेरिकन मीडियानुसार, एलन मस्क यांनी न्यूरोलिंक स्टार्टअपमध्ये १०० मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे.