शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

प्रवासात तब्बेत जपण्याचे सोपे उपाय

By admin | Updated: April 27, 2017 17:32 IST

प्रवास करताना थोडी खाण्यापिण्याची आणि व्यायामाचीही काळजी घेतली तर आपल्यासोबत सगळ्यांचीच सहल आनंददायी होते.

 

-अमृता कदम

तुम्ही जेव्हा प्रवासाला निघता तेव्हा वेगळ्या ठिकाणी गेल्यावर हवामानात होणारा बदल, खाण्या-पिण्यातले बदल, धावपळ याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. सर्दी-पडशासारख्या काही किरकोळ तक्रारींबरोबरच कदाचित काही गंभीर त्रासही होऊ शकतात. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या सोबत प्रवास करणाऱ्यांचाही रसभंग होतो. म्हणूनच प्रवास करताना थोडीशी काळजी घेतली तर तुमचा प्रवास आनंददायी आणि आरोग्यदायीही होईल. 

 

 

                                              

जर्नी हॅपी होण्यासाठी 

* प्रवास म्हणजे मौजमजा असली तरी तुमच्या रोजच्या व्यायामाला अजिबात फाटा देऊ नका. अगदी नेहमीसारखा नाही पण किमान अर्ध्या तासाचा व्यायाम चुकवू नका. तुमची राहण्याची व्यवस्था ज्या हॉटेलमध्ये आहे, तिथे जिम असेल तर तुमचं व्यायामाचं रूटिन मोडणार नाही. स्वीमिंग पूल सारखी सोय असेल तर मग पोहण्याचा आनंद आणि व्यायाम केल्याचं समाधान दोन्हीही पदरात पडेल. आणि अगदी काहीच नसेल तर सकाळी लवकर उठून मस्तपैकी जॉगिंगला तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. सकाळी अगदी स्वत:साठी काढलेला हा अर्धा तास तुम्हाला दिवसभराच्या प्रवासात एकदम ताजतवानं ठेवेल.

* प्रवासामध्ये भरपूर पाणी पित राहणंही अत्यंत गरजेचं आहे. फिरण्याच्या, वेगवेगळी ठिकाणं पाहण्याच्या गडबडीत पाणी पिलं जातंच असं नाही. पाण्याची बाटली वागवण्यापेक्षा अनेकजण लिमलेटच्या गोळ्या सोबत ठेवायला किंवा चटकन कोल्ड्रिंक विकत घेऊन प्यायला प्राधान्य देतात. या गोष्टींनी तात्पुरतं बरं वाटत असलं तरी पाण्याला कोणताही पर्याय नाही. विशेषत: तुम्ही जर उष्ण हवामानाच्या प्रदेशात गेला असाल तर योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशनही होऊ शकतं. त्यामुळे प्रवासात फिट राहण्यासाठी पाणी मस्ट आहे.

* प्रवासामध्ये गाडी हाताशी असल्यानं बरेचजण चालायचं टाळतात. पण तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं त्या शहरामध्ये चालत फिरा. शहरातली ठिकाण, अगदी गल्ली-बोळ, तिथल्या बाजारपेठा पायी चालून पाहा. सहलीत अशी पायपीट बसून बसून जडावलेल्या शरीराला आणि प्रवासानं शिणलेल्या मनाला विरंगुळा देते.

 

* प्रवासामध्ये सतत काही ना काही खाणं (बऱ्याचदा ते अरबट-चरबट सदरात मोडणारंच असतं) सुरूच असतं. त्यामुळे खाणं झालंय ना असं म्हणत किंवा खूपदा भटकण्याच्या नादात जेवायंच राहून जातं. असं अजिबात करु नका. नाश्ता आणि दुपारचं जेवण शक्यतो टाळू नका. संध्याकाळी मग थोडंस हलकं काहीतरी खाल्लं तरी चालेल. प्रवासातलं खाण हे स्वच्छ आणि आरोग्यदायी असावं. प्रत्येकवेळी आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारखं खायला मिळेलच असं नाही. त्यामुळे घरून निघताना थोडा कोरडा खाऊ सोबत ठेवावा. तसंच शक्य तेव्हा फळंही खावीत.

* प्रवासातली खाण्यापिण्यातली जी काही कमतरता असेल ती दूर करण्यासाठी आणि स्वत:ला उत्साही, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्याही घेऊ शकता. या गोळ्यांचे काही साइड-इफेक्टस नसतात. पण तरीही एकदा डॉक्टरांचा सल्लाही घेतलेला चांगला.

* भरपूर फिरताना योग्य ती काळजी घेतली नाही तर सगळ्यात जास्त नुकसान होतं ते तुमच्या त्वचेचं. शिवाय आजकाल वातावरणातले विविध घटक, खाद्यपदार्थ यांसरख्या गोष्टींची अ‍ॅलर्जी ही देखील खूप कॉमन गोष्ट झाली आहे. त्यामुळेच प्रवासात बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला आणि गॉगल्स घालायला विसरु नका. त्याचबरोबर कोरड्या हवेच्या ठिकाणी फिरायला गेला असाल तर तुमच्या त्वचेला योग्य प्रकारे मॉश्चराईजही करा. नाहीतर अशा ठिकाणी त्वचा कोरडी पडते. प्रवासाहून परत येताना सोबत घेऊन यायचे असतात ते आनंदाचे क्षण आणि मजेशीर आठवणी. आजारपण किंवा दुखणी नाही. म्हणूनच प्रवास करताना काही पथ्यं आवर्जून पाळली तर खऱ्या अर्थानं आपला प्रवास ‘हॅपी जर्नी’ होतो.