थंडीचे दिवस सुरू झाल्याने इतर वेळी लोकांना होणारा सायनसचा त्रास तुलनेने जास्त होतो. सर्दी, डोकेदुखी यांसारखे आजार डोकावू लागतात. सध्याच्या काळात एसीच्या अति वापरामुळे आणि थंड अधिक प्यायल्यामुळे सायनसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. अशात हिवाळ्याच्या दिवसात निर्माण होणाऱ्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर या काही टिप्स नक्की वाचा.
सायनसची लक्षणेः
1) सायनसच्या वेदना सकाळी जास्त जाणवतात.
२) डोके दुखणे, डोक्याची हालचाल केल्यास तीव्र वेदना होतात.
३) ताप येणे, चेहरा सुजणे, नाक चेंदणे ही लक्षणे दिसून येतात.
४) सायनसच्या ठिकाणी वेदना होतात.
५) डोळ्यांच्या आणि नाकाच्या हाडांमध्ये वेदना होतात.
सायनसचा त्रास होऊ नये म्हणून काय करावेः
१) सायनसचा त्रास जास्त होत असल्यास एसी आणि फॅनचा वापर टाळावा.
२) सर्दी खोकला होऊ देऊ नये.
३) धूळ, धूर आणि हवा प्रदुषण टाळावे.
४) धुम्रपान, मद्यपान, यांसारखी व्यसनं टाळवीत.
५)दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.