शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

...तर माणसाचं अस्तित्व धोक्यात; 'हे' आहे चिंताजनक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 15:44 IST

आधुनिक जीवनशैली, ताण-तणावामुळे माणसासमोर अस्तित्वाचा प्रश्न

मुंबई: पुरुषांची प्रजनन क्षमता दिवसेंदिवस कमी होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. ही क्षमता अशीच कमी होत राहिल्यास माणसाचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. रसायनांचा अतिवापर, प्रदूषण आणि आधुनिक जीवनशैलीचा विपरित परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होत असल्याचं निरीक्षण संशोधनातून नोंदवण्यात आलं आहे. यासाठी अमेरिका आणि युरोपमधील कृत्रिम बिजारोपण केंद्रात येणाऱ्या 1 लाख 24 हजार पुरुषांच्या प्रजनन क्षमतेचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये पुरुषांच्या विर्याचा दर्जा दर वर्षी 2 टक्क्यांनी खालावतो आहे. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला असल्यास आणि अनेकदा अनेकदा स्पर्म डोनरची मदत घेतली जाते. मात्र आणखी एका संशोधनातून स्पर्म डोनर्सच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. या संशोधनात 2 हजार 600 स्पर्म डोनर्सचा अभ्यास करण्यात आला. आधुनिक जीवनशैली, त्यामुळे येणारे ताण-तणाव यांचा प्रतिकूल परिणाम स्पर्म डोनरच्या शारीरिक स्थितीवरही झाल्याचं यातून दिसून आलं. त्यामुळे या संशोधनाचं गांभीर्य वाढलं आहे. सध्या बहुतांश पुरुष दोन मुलांना जन्म देऊ शकतात. मात्र विर्याचा दर्जा घसरत चालल्यानं माणसाच्या अस्तित्वासमोर मोठं संकट निर्माण होऊ शकतं. 2017 मध्येही सध्याचं वातावरण आणि त्याचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होत असलेला परिणाम याबद्दल एक संधोशन करण्यात आलं. 1973 ते 2011 या कालावधीत विर्याचं प्रमाण आणि दर्जा यामध्ये 59 टक्क्यांनी घट झाली आहे. शेतीमध्ये केला जाणारा रसायनांचा भरमसाठ वापर, हार्मोन्सवर परिणाम केली जाणारी किटकनाशकं, तणाव, धूम्रपान, स्थूलत्व यामुळे विर्याच्या दर्जावर परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.  

टॅग्स :Healthआरोग्य