शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

झोपेशी पंगा नको, तिच्या गळ्यात पडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 08:03 IST

झोपेशी आपण ‘राग’ धरला आणि झोपेपासून दूर जात गेलो तर काय होऊ शकतं हे कळलं म्हणजे झोपेशी खुन्नस खाण्यापेक्षा तिच्याशी दोस्ती कशी करायची, याचा प्रयत्न आपण स्वत:च करायला लागू.

अनेक कारणं असतात, पण त्यामुळेच आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही आणि झोपेवर खुन्नस काढण्याची आपली खुमखुमी वाढत जाते, याविषयी आपण मागच्या लेखात वाचलं. झोपेशी आपण ‘राग’ धरला आणि झोपेपासून दूर जात गेलो तर काय होऊ शकतं हे कळलं म्हणजे झोपेशी खुन्नस खाण्यापेक्षा तिच्याशी दोस्ती कशी करायची, याचा प्रयत्न आपण स्वत:च करायला लागू.

इतर गोष्टींसाठी वेळ मिळावा, यासाठी आपण खरं तर वेळेशीही संघर्ष करायला लागतो. आपल्या संपूर्ण आयुष्यावरच त्याचा नकारात्मक परिणाम होतो. कमी झोपेमुळे आपल्या विचारांची क्षमता कमी होते. निर्णय घेण्याची क्षमता दुबळी होऊ लागते. दिवसा पेंगुळल्यासारखं वाटायला लागतं. त्यामुळे अख्खा दिवसच वाईट जातो. काम करण्याची इच्छा, शक्ती राहत नाही. प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. कोणतीही गोष्ट शिकण्याच्या प्रक्रियेत कोलदांडे बसतात. दिवसाच्या पेंगुळगाड्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे झोपेशी पंगा घेण्याचं आधी बंद करा आणि तिच्या गळ्यात पडा.

कशी कराल झोपेशी दोस्ती?..१- रात्री आपली झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ ठरवून घ्या. साधारणपणे त्याच वेळेला झोपा आणि उठा. २- संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी मद्य, कॅफिन यासारखी पेये घेण्याचे कटाक्षाने टाळा. ३- मोबाइल, टॅबलेट्स, पीसी.. यासारखी इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस तुम्हाला कितीही प्रिय असली, तरी रात्री किमान झोपेपूर्वी अर्धा तास तरी त्यांच्यापासून दूरच राहा.४- रोजचं,  त्यातही रात्रीचं आपलं शेड्यूल बिघडणार नाही याची आवर्जून काळजी घ्या.५- ‘रिलॅक्सेशन मेथड्स’चा अवलंब करा. त्याची तंत्रं समजून घ्या. ध्यान, योग, स्ट्रेचिंग, पुस्तक वाचन.. इत्यादी गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी करा. त्याचं रुटिन लावून घ्या. ६- यामुळे तुमच्या मनावरचा ताण तर हलका होईलच, पण झोपेवर खुन्नस काढण्याची वेळ येणार नाही. ७- आपल्या बेडरुममधलं वातावरण झोपेला आमंत्रण देईल, असं ठेवा. शांतता, कमी प्रकाश, आरामदायी बिछाना.. अशा गोष्टींमुळे झोपेला उत्तेजन मिळेल.८- एवढं करूनही झोप आपलं ऐकायला तयार नसेल, तर डॉक्टरांना मध्यस्थी करायला सांगा..

टॅग्स :Healthआरोग्य