शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

Goat Milk : शेळीच्या दुधाने डेंग्यूचा रुग्ण खरंच बरा होतो? जाणून घ्या बकरीच्या दुधाचे खास फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 20:01 IST

डेंग्यू झाल्यास अनेकजण घरगुती उपायांचा अवलंब करतात. यांपैकी एक म्हणजे, शेळीचे दूध. प्लेटलेट्स काउंट कमी झाल्यास शेळीचे दूध फायदेशीर ठरू शकते, असे मानले जाते. पण, खरोखरच शेळीच्या दुधात डेंग्यू बरा करण्याची क्षमता आहे? जाणून घेऊया...

पावसाला सुरुवात होताच पुन्हा एकदा डेंग्यूचा धोका वाढला आहे. या आजारावर वेळीत उपचार न केल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो. डेंग्यू झाल्यास अनेकजण घरगुती उपायांचा अवलंब करतात. यांपैकी एक म्हणजे, शेळीचे दूध. प्लेटलेट्स काउंट कमी झाल्यास शेळीचे दूध फायदेशीर ठरू शकते, असे मानले जाते. पण, खरोखरच शेळीच्या दुधात डेंग्यू बरा करण्याची क्षमता आहे? जाणून घेऊया...

का फायदेशीर आहे शेळीचं दूध? -शेळीच्या दुधात व्हिटॅमिन B6, B12, C आणि D भरपूर प्रमाणात असते. या दुधात फोलेट बाइंडिंग घटकही मोठ्या प्रमाणावर असतात. यांमुळे फॉलिक ऍसिडचे प्रमाण देखील वाढते. शेळीच्या दुधातील प्रथिने जटिल नसतात, यामुळे ते पचण्यासही सहज असते. या दुधामुळे ब्लड काउंटही वाढतो.

शेळीच्या दुधाचे फायदे -1. शेळीच्या दुधात सेलेनियम असते, जे इम्यून सिस्टिम मजबूत करून आजारांपासून दूर ठेवते.2. शेळीच्या दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, फास्फोरस, पोटॅशियम, आयर्न आणि कॉपर आढळते. जे मेटॅबॉलिझम रेट चांगला राहतो आणि शरीर निरोगी राहते.3. शेळीच्या दुधात कॅल्शियम आणि अमीनो अॅसिड आढळत असल्याने या दुधामुळे दात आणि हाडेही मजबूत होतात.4. शेळीच्या दुधात चांगले फॅटी अॅसिड असते, जे कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करते. पोटॅशियम अधिक असल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये रहते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.5. शेळीच्या दुधात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे सूज आणि पेटाच्या समस्या कमी करण्यास मदत करते.

डेंग्यूमध्ये शेळीचे दूध फायदेशीर आहे? -काही तज्ज्ञांच्या मते डेंग्यूमध्ये शेळीचे दूध फायदेशीर असू शकते. मात्र, डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर एखादी व्यक्ती रोज शेळीचे दूध घेत असेल तर तो घेऊ शकतो. मात्र, केवळ डेंग्यू बरा करण्यासाठी शेळीचे दूध घेण्याची आवश्यकता नाही. कारण, डेंग्यूमध्ये शेळीचे दूध फायदेशीर असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.

(टीप - संबंधित माहिती माध्यमांतील वृत्तांच्या आधारे देण्यात आली आहे. आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे अत्यंत अवश्यक आहे...)

टॅग्स :dengueडेंग्यूmilkदूधdoctorडॉक्टर