शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश! शस्त्रक्रियेनंतर वृद्धाच्या हृदयाच्या व्हॉल्व्हमधून काढला 6 सेमी लांबीचा 'फंगल बॉल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:17 IST

Fungal Ball Removed : डॉक्टरांच्या देखरेखीखाली, रुग्णाला 45 दिवसांपर्यंत नसाद्वारे अँटी-फंगल औषध देण्यात आले. यादरम्यान रुग्णाची प्रकृती स्थिर झाली असून आता तो पूर्णपणे बरा आहे.

नवी दिल्ली : भारताच्याडॉक्टरांनी (Doctors) पुन्हा एकदा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. डॉक्टरांच्या टीमने एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Complex Surgery) करून दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या हृदयाच्या व्हॉल्व्हमधून 'सहा सेमी लांबीचा फंगल बॉल (Fungal Ball)' काढण्यात यश मिळवले आहे. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. 

गंभीर हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या सुरेश चंद्रा यांनी मीडियाला सांगितले की, 2021 मध्ये त्यांना कोरोनाची लागण (Corona Infected) झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी स्वत:ला घरीच आयसोलेट केले होते. तसेच, कोरोनाची लागण झाल्यानंतर काही महिन्यांनंतर त्यांना वारंवार खोकला आणि ताप येत होता. यासाठी त्यांनी अनेक डॉक्टरांशी संपर्कही केला. कोरोना संसर्गानंतर ही सामान्य लक्षणे असू शकतात, असे त्यावेळी सर्व डॉक्टरांना वाटले होते, असे रुग्ण सुरेश चंद्रा यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी त्यांच्या महाधमनीचा  (एओर्टिक) व्हॉल्व्ह बदलण्यात आला होता. रुग्ण सुरेश चंद्र यांचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. त्यानंतर त्यांनी या आजाराबाबत फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. यावेळी डॉक्टरांनी आपल्या तपासणीत उघड केले की, हा एक प्रकारचा दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग 'इंफेक्टिव एंडोकार्डिटिस' आहे. या आजाराची लक्षणे आढळून आल्यावर, अनुभवी डॉक्टरांच्या टीमने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या हृदयाच्या व्हॉल्व्हमधून सहा सेमी लांबीचा 'फंगल बॉल' काढण्यात यश मिळवले.

ऑपरेशननंतर 45 दिवस अँटी-फंगल औषधअधिकाऱ्यांनी सांगितले की, ही एक अत्यंत दुर्मिळ केस आहे, जी हृदयाचे ऑपरेशन करणार्‍या रूग्णांमध्ये बर्‍याच वेळा आढळते आणि अशा प्रकरणांमध्ये रूग्ण जगण्याची शक्यता केवळ 50 टक्के असते. काही महिन्यांपूर्वी हे ऑपरेशन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, डॉक्टरांच्या देखरेखीखाली, रुग्णाला 45 दिवसांपर्यंत नसाद्वारे अँटी-फंगल औषध देण्यात आले. यादरम्यान रुग्णाची प्रकृती स्थिर झाली असून आता तो पूर्णपणे बरा आहे.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारतdoctorडॉक्टर