शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयासाठी कोणतं तेल ठरतं बेस्ट? डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलं उत्तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 11:10 IST

Healthy Oils: अनेकांना प्रश्न पडतो की, जेवण बनवण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करावा? या प्रश्नाचं उत्तर माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी दिलं आहे.

Healthy Oils: वेगवेगळे पदार्थ किंवा जेवण बनवण्यासाठी घरांमध्ये रोज वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. तेल हे शरीरासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. अशात जर तुम्ही आरोग्याची काळजी घेण्यासाठी कितीची चांगले पदार्थ खाल्ले, पण जर तेल चांगलं नसेल तर आरोग्य बिघडल्याशिवाय राहणार नाही.

कुकिंग ऑइल जर हेल्दी नसेल तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुकिंग ऑइल चांगलं नसेल तर हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं. मग अनेकांना प्रश्न पडतो की, जेवण बनवण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करावा? या प्रश्नाचं उत्तर माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी दिलं आहे. डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) हे एक कार्डियोथोरेसिक सर्जन आहेत. त्यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर करत आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं असतं याबाबत सांगितलं आहे.

हृदयासाठी फायदेशीर तेल

राइस ब्रान ऑईल 

आरोग्याचं चांगलं ठेवण्यासाठी राइस ब्रान ऑईलचं सेवन करू शकता. हे तेल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. याने इन्फ्लेमेशन दूर होतं आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याशिवाय या तेलाने ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. शरीरात बॅड कॉलेस्ट्रोल कमी करण्यासही हे तेल मदत करतं.

ग्राउंडनट ऑईल

हृदय निरोगी ठेवण्यासाठी खासकरून तुम्ही ग्राउंडनट ऑईलचा वापर करू शकता. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, मॉनोअनसॅचुरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स असतं. जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात. या तेलाच्या सेवनाने शरीरात कॉलेस्ट्रोल वाढण्याचा धोकाही कमी होतो.

मोहरीचं तेल

मोहरीच्या तेलाचा वापर भरपूर लोक करतात. या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड कमी प्रमाणात असतं. तसेच फायदेशीर मॉनोअनसॅचुरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी अ‍ॅसिड भरपूर असतं. या तेलाने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. सोबतच शरीराला यातून अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगल आणि अ‍ॅंटी-बायोटिक गुणही मिळतात.

ऑलिव ऑईल 

ऑलिव्ह ऑईल हे आरोग्य चांगंल ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. यात भरपूर अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. तसेच या तेलात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही भरपूर असतात. या तेलाने शरीरात कॉलेस्ट्रोल वाढत नाही आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

तिळाचं तेल

तिळाच्या तेलामध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे शरीराचं फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. यात  ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असतं आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणही असतात. तिळाच्या तेलामध्ये झिंक, आयर्न, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशिअमही भरपूर असतं.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स