'ओमकार' हा मंत्र हिंदू धर्माशी संबंधित असला तरी, वैज्ञानिकांमध्ये यासंदर्भात मोठी उत्सुकता आहे. अनेक डॉक्टर्स आणि वैज्ञानिक याला फ्रिक्वेंसी मानतात. अशी युनिव्हर्सल फ्रिक्वेंसी आपल्या शरिरातील अनेक समस्या सोडवू शकते. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता अडातिया यांनी 'ओमकार' मंत्रासंदर्भात एक एक्सपेरिमेंट केले आहे. ज्याचे निकाल आपल्यालाही थक्क करतील.
मंत्राचा हृदयावर होणारा परिणाम - डॉक्टर श्वेता या ब्रेन सायंटिस्ट आहेत. त्यांना वैदिक मंत्रांच्या शक्तीवर प्रचंड विश्वास आहे. त्या प्राणायाम आणि मंत्रांच्या जापाने स्ट्रेस कमी करण्याच्या पद्धतींवर अभ्यास करत असतात. त्यांनी एक प्रयोग केला आहे, ज्यातून, ओमकार केल्याने आपली हार्ट रेट व्हेरिएबिलिटी (HRV) कमी होऊ शकते, असे समोर आले आहे.
...अन् हार्टरेट बदलला -श्वेता म्हणाल्या, ओमकार ही एक युनिव्हर्सल फ्रिक्वेंसी आहे, जिचा कुठल्याही धर्माशी काहीही संबंध नाही. त्यांनी आपल्या हाताच्या बोटाला पल्स ऑक्सीमीटर लावून हा प्रयोग करून दाखवला. त्यांनी ओमकार दोन पद्धतीने केला. त्यांनी सर्वप्रथम 'ओ'चा दीर्घ उच्चार केला. यानंतर ऑक्सीमीटरवर त्यांचा पल्सरेट 73 पर्यंत आल्याचे दिसून आले. यानंतर पुन्हा ओमकार करताना त्यांनी 'म' चा उच्चार दीर्घ केला (अधिक वेळ) यावेळी त्यांचे हार्टबीट 69 पर्यंत आले होते.
झोपण्यापूर्वी अशा पद्धतीने करा ओमकार अथवा 'ओम'चा उच्चार - श्वेता म्हणाल्या, जर एखाद्याला मेंदू सक्रिय करायचा असेल, तर त्याने 'ओम'मध्ये 'ओ'चा उच्चार दीर्घ अथवा अधिक वेळ करावा. तसेच आपल्याला, आराम हवा असेल अथवा रिलॅक्स फील करायचे असेल तर, तर 'म'चा उच्चार अधिक वेळ करावा.