शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या दिवसात प्रचंड आळस येतो? एकदा हे उपाय करून बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 12:14 IST

आळस माणसाचा शत्रु आहे हे आपण ऐकत आलोच आहोत. आळस आला तर कामेही वेळेवर पूर्ण होत नाहीत. मात्र या सवयीमुळे तुम्ही वेगळ्याच आजारांना निमंत्रण देऊ शकता.

थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. या दिवसात सकाळी लवकर उठायचा प्रचंड आळस येतो. अंथरुणातून उठावं असं वाटतच नाही. आळस माणसाचा शत्रु आहे हे आपण ऐकत आलोच आहोत. आळस आला तर कामेही वेळेवर पूर्ण होत नाहीत. मात्र या सवयीमुळे तुम्ही वेगळ्याच आजारांना निमंत्रण देऊ शकता. जास्तच झोपून किंवा लोळून राहिलात तर तुमचे वजन वाढू शकते स्थुलता येऊ शकते. त्यामुळे आळस झटकून लवकर कसे उठाल याचाच प्रयत्न करा. 

थंडीत जास्त झोपण्याची इच्छा का होते ?

थंडीमध्ये दिवस लहान असतात. अशावेळी शरिरात स्लीप हार्मोन्सची (sleep hormones) निर्मिती होते. परिणामी आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते. सकाळी थंडी अधिक असल्याने झोपून राहावेसे वाटते. 

कसा दूर करता येईल आळस ?

गजर लावून झोपा

झोपताना गजर लावूनच झोपा आणि गजर चा आवाजही मोठा ठेवा. गजराच्या आवाजाने नाही म्हणले तरी झोपमोड होतेच. मात्र गजर बंद करुन काही वेळाने उठू असे म्हणत झोपून राहू नका. थोड्यावेळाने उठू असे म्हणत कधी तासाभराची झोप होईल कळत नाही.

व्यायाम

सकाळी उठल्यावर व्यायाम करणे सर्वात चांगला उपाय आहे. व्यायाम केल्याने पुढे दिवसभर प्रसन्न वाटते. घराबाहेर पडून मैदान, पार्क किंवा बागेत व्यायाम करायला गेलात तर झोपही जाते आणि शरिराची हालचालही होते. 

दुपारची झोप टाळा 

दुपारी झोपण्याची सवय असेल तर ती आधी बंद करा. दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप येत नाही. रात्री उशिरा झोपल्याने सकाळी लवकर उठवत नाही. त्यामुळे दिनचर्या बिघडते. तसेच दुपारी झोपल्याने सुस्ती येते. त्यामुळे दुपारची झोप कटाक्षाने टाळावी.

रात्री झोपताना दिनचर्येची यादी बनवा

नवीन दिवस कसा सुरु करणार आहात, तुमची काय काय कामे असणार आहेत, कोणाकोणाला भेटायचे आहे हे रात्रीच लिहून ठेवा. यामुळे डोक्यात चक्र सुरु राहील की तुमचा दुसरा दिवस व्यस्त असणार आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स