शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

कधी द्याल लक्ष स्वत:कडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:32 IST

इतरांसाठी खूप काही केलं, करतोय.. थोडा वेळ स्वत:लाही द्या

ठळक मुद्देथोडा वेळ शांतपणे आपल्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. तुमचे ताणतणाव दूर होतील.वर्तमानात जगायला जगा.घरच्याघरी अगदी रोज पाच-दहा मिनिटं जरी शांतपणे बसलात, तरी समजा, तो एक प्रकारचा योगाच आहे.

- मयूर पठाडेसगळ्या जगाची आपल्याला काळजी.. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. कुठेही कोणतीही कमतरता नको.. मग ते आॅफिस असो, घर असो, नातेवाईकांचं असो, इतर जबाबदाºया असो किंवा स्वत:ची काही कर्तव्य.. सगळ्यांसाठी सगळं, अगदी मान मोडून आपण करत असतो.. पण आपल्यासाठी काय? आपल्याकडे, स्वत:कडे आपण किती लक्ष देतो? जिवाला थोडी तरी स्वस्थता आहे की नाही?..ही स्वस्थता आपल्याला कोणीच स्वत:हून देणार नाही. ती आपली आपणच मिळवायला हवी. ही धावाधाव जर थांबवली नाही आणि स्वत:कडे लक्ष दिलं नाही, तर आपलं आयुष्य हळूहळू आणि कदाचित अगदी अचानक, चालता-बोलता संपूनही जाईल..फुकाचे बोल किंवा फुकटचा सल्ला नाही हा, शास्त्रज्ञांनी त्याबाबत अधिकचं संशोधन करताना सगळ्यांनाच स्वत:कडे पाहाण्याची विनंती केली आहे. अगदी कळकळीनं..त्यासाठी काय करायला हवं, याचं मार्गदर्शनही त्यांनी केलं आहे.थोडं स्वस्थचित्त होण्यासाठी काय कराल?१- तुम्ही कधी बघितलंय स्वत:च्या श्वासाकडे? नसेल तर नक्की बघा. थोडा वेळ शांतपणे आपल्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. एक प्रकारचा निवांतपणा तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमचे ताणतणावही दूर होतील.२- भूतकाळात किंवा भविष्यकाळाच्या चिंतांनी स्वत:ला पोखरत बसण्यापेक्षा वर्तमानात जगायला जगा. थोडं स्लो डाऊन करा.३- ध्यानधारणेचाही चांगला उपयोग होतो. त्यासाठी अगदी ध्यानाच्या किंवा योगाच्या वर्गालाच जायला पाहिजे असं नाही. घरच्याघरीही अगदी रोज पाच-दहा मिनिटं जरी शांतपणे बसलात, तरी समजा, तो एक प्रकारचा योगाच आहे.४- आभासी जगातूनही थोडं बाहेर आलं पाहिजे. सोशल मिडियावर रमण्यापेक्षा मित्रमंडळींमध्ये प्रत्यक्ष जा. फोनवर बोलण्यापेक्षा त्यांची कधीतरी भेट घ्या. त्यातून मिळणारा आनंद नेहमीच जास्त असेल.