शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

जेवल्यानंतर तुम्ही या 6 गोष्टी करता का? मग त्या आधी थांबवा!

By admin | Updated: May 5, 2017 16:50 IST

जेवणानंतर आपण काय करतो हे जरा तपासून पाहा. कारण जेवणानंतरच्या सहा अशा सवयी ज्या आनंद देतात पण आरोग्याच्या दृष्टीनं त्या अतिशय घातक असतात.

 

आपण रोज अशा अनेक गोष्टी करत असतो ज्या आपल्या रोजच्या सवयीचा भाग असतात. आणि सवय म्हटली की ती जशी चांगली असते तशी वाईटही. अनेक सवयींमधून आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळत असतो पण आनंद मिळतो म्हणून या सवयी चांगल्याच असतात असं नाही. उलट काही सवयी नुसत्या वाईट असतात असं नाही तर धोकादायकच असतात. जेवणानंतर आपण काय करतो हे जरा तपासून पाहा. कारण जेवणानंतरच्या सहा अशा सवयी ज्या आनंद देतात पण आरोग्याच्या दृष्टीनं त्या अतिशय घातक असतात. तेव्हा आरोग्यदायी जगायचं असेल तर जेवणानंतरच्या या पाच गोष्टी तातडीनं थांबवायला हव्यात.

1. जेवणानंतर चहा कॉफीचे कप

अनेकांना सकाळ दुपारच्या जेवणानंतर लगेच चहा कॉफी प्यायची सवय असते. यामुळे अनेकांना विशेषत; दुपारच्या वेळेस ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. पण ही सवय अत्यंत घातक आहे. मुळातच चहा कॉफीमध्ये टॉक्सिन्स असतात. आणि जेवल्यानंतर लगेच चहा कॉफी प्यायलानं हे टॉक्सिन्स अन्नातील घटकांना शरीरापर्यंत पोहोचूच देत नाही. विशेषत: लोह आणि प्रथिनं या अन्नघटकांना शरीरापर्यंत पोहोचण्यास चहामुळे अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्तींच्या शरीरात लोहाची कमतरता असते त्यांनी तर ही सवय लगेच मोडावी. जेवणानंतर साधारणत: तासाभरानं चहा प्यायला तर चालतो.

 

   

2. भराभर चालणं.

जेवणानंतर चालायला जाण्याची सवय अनेकांना असते. खरंतर ही सवय चांगलीही आहे. पण जेवणानंतर लगेच चालण्याचे मात्र अनेक तोटेच आहेत. जेवल्यानंतर जर खास पचनासाठी आपण लगेच चालायला सुरूवात केली तर अन्न पचायलाच त्रास होतो. कारण पोटात एकवटलेले सर्व अन्नरस जेवणानंतर लगेचच्या चालण्याने वाहून जातात. आणि त्यामुळे अन्न पचायलाही अवघड जातं. अन्नरस वाहून गेल्यानं पोटात आम्ल म्हणजे अ‍ॅसिड तयार होतात ज्याचा परिणाम म्हणून अपचन होतं. आणि म्हणूनच जेवल्यानंतर साधारणत: अधर््या तासानं फिरायला जावं. आणि हे फिरणं दहा मीनिटांपेक्षा अधिक असू नये.

 

3. फळं खाणं.

फळं खाण्यासंबधी अनेक समज आणि गैरसमज आहे. अनेकजण म्हणतात की फळं नीट पचत नाही म्हणून ती रिकाम्या पोटी खावू नये म्हणून. तर कोणी म्हणतं रात्री फळं खाऊ खाऊ नये म्हणून. पण सत्य हे आहे की फळामध्ये जी साखर असते ती सहज पचण्यासारखी असते त्यामुळे दिवसातल्या कोणत्याही वेळी फळं खावं. अपवाद फक्त जेवल्यानंतर लगेचचा. जेवल्यानंतर लगेच फळ खाण्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच खूप होतो. कारण जेवल्यानंतर फळ खाल्लं तर त्याचं पचन होण्यासाठी पुढे सरकू शकत नाही. कारण पोटात जेवल्यामुळे अन्न असतं. त्यामुळे फळ फोटात तसंच पडून राहतं. आणि पोटात हे पचनाविना पडून राहिलेलं फळ धोकादायक असतं.जेवल्यानंतर साधारणत: एखाद्या तासानं फळ खाणं फायदेशीर ठरतं.

 

4. छोटीशी डुलकी

जेवल्यानंतर डुलकी घ्यायची म्हणून लगेच झोपणं ही धोकादायक सवय आहे. अन्न पचनासाठी गुरूत्वाकर्षण ही संकल्पना खूप काम करते. जेवल्यानंतर झोपण्यासाठी म्हणून लगेच आडवे पडलो तर पोटातील अन्नरस पोटातून बाहेर पडतात , ते पोटात थांबत नाही. त्यामुळे आतड्यात जळजळ अ‍ॅसिडिटी यासारखे त्रास होतात. त्यामुळे जेवल्यानंतर झोपलं तर आराम मिळण्याऐवजी उलटा अ‍ॅसिडिटीचा त्रासच आपण ओढावून घेतो.

 

 

 

5. आंघोळ करणं.

जेवल्यानंतर लगेचच्या आंघोळीमुळे थेट पचनसंस्थेच्या कामात अडथळा निर्माण होतो. आंघोळ करताना शरीराचं तापमान वाढतं. ते कमी करण्यासाठी मग रक्तप्रवाह आणि ऊर्जा त्वचेकडे सरकते. जेवल्यानंतर रक्तप्रवाहाची आणि ऊर्जेची गरज पोटात असते कार्ण त्यातूनच अन्नाचं पचन होणार असतं. पण आंघोळीमुळे ही सर्व प्रक्रिया उलट दिशेने होवून अन्न पचायला ऊर्जाच शिल्लक राहात नाही. परिणामी पचनाच्या संबंधीचे आजार सतत ये-जा करत राहतात.

 

6. सिगारेट ओढणं.

जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढणं ही सवय अनेकांना (विशेषत: पुरूषांना) असते. या सवयीमुळे कॅन्सरची , श्वसनासंबंधीच्या विकारांची शक्यता बळावते. जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढल्यानं अल्सर होतो.