शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

आॅफिसमध्ये ‘असं’ वागता? मग लक्षात ठेवा, चूक तुमचीच!

By admin | Updated: June 9, 2017 19:19 IST

आपल्याही नकळत आॅफिसमध्ये आपण अशा काही चूका करतो, ज्या आपल्यालाच छळतात.

-नितांत महाजनआपण तसे चांगलेच असतो. आपण सगळ्यांशी चांगलेच वागतो, लोकच आपल्याला त्रास देतात असं आपल्याला वाटतं. तसं होतंही. मात्र आपल्याही नकळत आपण आॅफिसमध्ये अशा काही चूका करत असतो की त्या आपल्याला छळतात. आपले पाय ओढतात. आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरतात. आणि आपल्याला ते कळतही नाही, जाणवतही नाही. लक्षात येत नाही. आणि आलंच तर आपण ते मान्यही करत नाही. मात्र तपासून पहा, आपण या चूका करतो का? करत असू तर मान्य करू की चूक आपलीच, आपण जरा आपलं तंत्र सुधारलं पाहिजे.१) आपण गप्प-घुमे?आपल्याला वाटतं आपण भलं, आपलं काम भलं. आपण बोलतो कमीच. गप्प राहतो. पण इतरांना वाटतं आपण घुमे आहोत, किंवा स्वत:ला शहाणं समजतो. जास्त फटकून राहतो. इतरांना कमी लेखतो. कामास काम बोलतो कारण आपण त्यांना मोजत नाही. मग लोक आपल्याला अकारण लेबल लावतात आणि सायडिंगला लावतात. टीममध्ये घेत नाहीत.२) काहीही हो, तुम्ही अतीच रिअ‍ॅक्ट करता?गोष्टी सोपी असते, साधं तुमचं टेबल पुसलेलं नसतं, किंवा तुमचं काम कुणी ऐकत नाही, किंवा फोन उचलत नाही असं काहीही बारीक सारीक मात्र तुम्ही असे काही चिडता, रिअ‍ॅक्ट करता की विचारू नका. आॅफिस डोक्यावर घेता,बडबडता, तोंड सोडता. आणि त्याचा परिणाम असा होतो की चिडके, अती शहाणे अशी लेबलं लागतात आणि लोक तुम्हाला टाळू लागतात.३) नाही, मी बिझी आहे?तुम्हाला कुणी जेवायला बोलावतं, पार्टीला बोलावतं, घरगुती कार्यक्रमाला बोलावतं किंवा सहकारी म्हणतात चल रे जरा चहा प्यायला, तुमचं एकच पालूपद, नाही, मी बिझी आहे. तुम्ही कुणाकडच्या कार्यक्रमाला जात नाही. कुणासोबत चहा पीत नाही. कुणाचं सुखदु:ख शेअर करत नाही. कदाचित तुम्ही खरंच कामात असाल पण त्यानं लोकांना काय वाटतं की, आपल्याला हा कमी लेखतो. गैरसमज होतात. आणि तुमचा स्ट्रेस वाढतो कारण लोक त्यानंतर तुम्हाला त्यांच्यात घेतच नाही.४) गॉसिप करता?तुम्हाला गॉसिप करायची फार सवय आहे. याचं त्याचं करता, सहज सांगता, बोलून जाता, लोकांच्या भानगडीत नाक खुपसता? मग तुमचं आॅफिसात नाव बदनाम झालंच समजा.५) सतत कटकट करता?काही लोक आॅफिसात आले की कटकट करायला लागतात. सतत भूणभूण. सतत चिडचिड. कशावरुनही कटकट. पगारवाढ, बॉस ते हवामान ते स्वच्छता ते इतर लोक ते काम कारणच लागत नाही. सतत कटकट, सतत निगेटिव्ह मोड. अशा सहकाऱ्यांना लोक कंटाळतात. ते आॅफिसचं वातावरण गढूळ करतात. त्यामुळे त्यांच्याकडे चांगली कामंही येत नाहीत.६) मतं मांडताना बेभान होता?आॅफिस म्हटलं की चर्चा होणारच. राजकीय, सामाजिक चर्चा होतात. गप्पा रंगतात. सगळ्यांना सगळ्यांची मतं पटत नाहीतच. मात्र ते वाद तेवढ्यापुरते न ठेवता तुम्ही हमरीतुमरीवर येता? तावातावानं मतं मांडता? भांडता? आवाज चढवता? आणि त्यात तुम्हाला काही गैर वाटत नाही. पण इतरांना मात्र वाटतं की तुम्ही आक्रमक आहात, लोकांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करता, ऐकून घेत नाही. दुसऱ्याच्या मतांची कदर करत नाहीत. तुम्ही अकारण मग भांडकुदळ ठरवले जाता.