शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
7
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
8
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
9
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
10
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
11
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
12
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
13
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
14
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
15
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
16
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
17
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
18
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
19
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
20
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा

डिजिटल डिटॉक्स... ही काय भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 09:48 IST

मुद्द्याची गोष्ट :  ना कामात मन लागतंय, ना झोप येते धड? डोकं भंजाळलं-विचारांनी डोकं फुटून जाईल असं वाटतं? छातीत धडधडतं - तुम्हाला खरंच भयंकर आजार झालाय... या आजाराचं नाव माहितेय?"

प्रियांका निर्गुणलोकमत सखी डॉट कॉम

पण अनेकदा 'बॉडी डिटॉक्स' हा शब्द ऐकला असेल. 'डिजिटल डिटॉक्स' हा देखील असाच एक प्रकार आहे. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत चोवीस तास आपल्या हातात मोबाइल, लॅपटॉप यांसारखी अनेक गॅजेट्स असतात. हे गॅजेट्स वापरण्याच्या आपण इतके आहारी गेलेलो असतो की, आपण त्यांच्याशिवाय मिनिटभरही राहू शकत नाही. परंतु या सवयीचे एकूणच आपले आरोग्य आणि शरीरावर वाईट परिणाम झालेले दिसून येतात. आपले शरीर डिटॉक्स केल्याने त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. या गोष्टींमुळे आपले शरीर डिटॉक्स ठेवण्यास अधिक मदत होते. अगदी त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी 'डिजिटल डिटॉक्स' करणे आवश्यक असते. 

आजकाल सोशल मिडिया आणि मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्क्रिनवर सतत काम केल्याने किंवा मोबाईलचा जास्त वापर केल्याने याचा फक्त डोळ्यांनाच त्रास होत नाही तर मानसिक आरोग्यावरही अधिक जास्त परिणाम होतो. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी डिजिटल गोष्टींपासून थोडे दूर राहणे गरजेचे असते. यासाठी डिजिटल डिटॉक्स  कसे करावेत ते पाहूयात.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ? आपला फोन अगदी काही वेळ न मिळाल्यास अस्वस्थता आणि तणाव जाणवू लागतो, फोन कुठे असेल याचं टेन्शन येऊ लागते. वारंवार काही मिनिटांनंतर फोन चेक करण्याची आपल्याला सवय लागते. फोन चेक न केल्याने ट्रेंडबाहेर किंवा मागे पडण्याची भीती वाटते, असे प्रकार अनेकदा आपल्या सोबत घडतात, अशावेळी आपल्याला 'डिजिटल डिटॉक्स' करण्याची गरज आहे. सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे आणि आपण या प्लॅटफॉर्मवर विनाकारण आपला वेळ वाया घालवत असतो. काही काम नसले की फोन घेऊन पडून राहतो आणि सतत सोशल मीडिया चाळत बसतो. रोजरोज हेच काम केले, की याची सवय लागते. ही सवय मोडण्यासाठी मोबाइल किंवा लॅपटॉप यांसारख्या स्क्रिनपासूनकाही काळासाठी लांब राहणे आणि सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर कमी करणं, याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात. ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतो अगदी त्याचप्रमाणे सतत मोबाईल, लॅपटॉप किंवा कोणत्याही स्क्रिन गॅजेट्सच्या आहारी जाणे हे देखील आपल्यासाठी घातक आहे. 

रिअल लाइफशी व्हा कनेक्ट nप्रत्येकवेळी फोन कॉल, मेसेजेस, व्हिडीओ कॉल यांचा माध्यमातून कनेक्ट होण्यापेक्षा रियल लाइफशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा.nमित्र-मैत्रिणी, नातेवाईकांशी मोबाईल फोन द्वारे कनेक्ट होण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन भेटा.nएकमेकांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करा.nजर्नल ऑफ सोशल अँड क्लिनिकल सायकोलॉजी मधील २०१८ मधील संशोधन सूचित करते की सोशल मीडियाचा कमी वापर केल्याने मूड आणि आरोग्य सुधारते. २०-२०-२० नियम पाळा दिवसभर स्क्रीनकडे सतत पाहून आपले डोळे थकतात. यासाठी२०-२०-२० नियम पाळणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. यासाठी दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट  कोणत्याही गॅजेट्स आणि स्क्रीनपासून दूर पहा.यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो. या नियमाचे पालन करण्यासाठी आपण टायमर देखील सेट करू शकता.

स्क्रीनपासून काही काळ राहा दूर nसतत मोबाइल, लॅपटॉप यांसारख्या स्क्रिनचा वापर कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे 'डिजिटल डिटॉक्स' करणे. काही ठराविक वेळासाठी मोबाइल, लॅपटॉप यांसारख्या स्क्रीनचा वापर कमी करणे किंवा त्यांच्यापासून दूर राहिल्याने मानसिक आरोग्य चांगले राखले जाते. nआणि तुम्हाला पुन्हा चार्ज झाल्यासारखे वाटते. अशा मोकळ्या वेळात तुमचा आवडता छंद जोपासा किंवा कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी करा जी पूर्णपणे स्क्रीनमुक्त असेल. nतुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फिरायला जाऊ शकता किंवा काही स्वयंपाक करू शकता किंवा झोपू शकता. २०१९ मध्ये सायकॅट्रिक रिसर्चने केलेल्या अभ्यासानुसार, स्क्रीनपासून थोड्या काळासाठीही डिस्कनेक्ट राहिल्याने मानसिक आरोग्य सुधारते.

चांगली झोप घ्या डिजिटल बर्नआउट टाळण्यासाठी झोप एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. स्क्रीनवरील निळा प्रकाश तुमची झोप खराब करतो. स्क्रीनमधून सतत येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे झोपेला प्रेरित करणारे हार्मोन म्हणजेच मेलाटोनिनची पातळी कमी करते.हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंग यांच्या म्हणण्यानुसार, कमी झोपेमुळे स्ट्रेस वाढतो. त्यामुळे चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. स्क्रीन पाहत असल्यास, निळा प्रकाश-अवरोधित चष्मा वापरा. तसेच, तुमच्या बेडरूमला स्क्रीन-फ्री झोन ​​बनवा. झोपण्यापूर्वी फोनवर स्क्रोल करण्याऐवजी, ध्यान करा.