शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
2
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
3
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
4
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
6
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
7
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
8
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
9
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
10
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
11
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
12
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
13
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
14
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
15
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
16
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
17
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
18
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
19
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
20
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...

बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने नाक धुतले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 10:42 IST

शहरात होणारी बांधकामे, वाढलेली वाहने, लहान मोठे कारखान्यातून सोडण्यात येणारा धूर आदींमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबईराज्यात जवळपास सर्वच शहरांत वायू प्रदूषण वाढले आहे. नागरिकांनी आरोग्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार असून बाहेरून आल्यानंतर प्रत्येकाने कोमट पाण्याने नाक धुणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. रस्ते वाहतूक, वाहने, कारखान्यातून सोडण्यात येणारे धूर, कोळसा, लाकूड, वाळलेले गवत यांचे जाळणे, बांधकामे व धुलिकणात वाढ आदींमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. वायू प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर झाला असून ॲलर्जी सारख्या प्रकारात वाढ होऊन सर्दी व खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. 

शहरात वायू प्रदूषण वाढलेशहरात होणारी बांधकामे, वाढलेली वाहने, लहान मोठे कारखान्यातून सोडण्यात येणारा धूर आदींमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली. गेल्या महिन्यात प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्यावर, न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने बांधकामावर निर्बंध घालून त्यांना नोटिसा दिल्या आहेत. तसेच धुलिकणात वाढ झाल्याने, पाणी शिंपडण्याचे काम करण्यात आले.

भरपूर पाणी पिणे आवश्यक वायू प्रदूषणामुळे ॲलर्जी, सर्दी-खोकला, दमा आदीच्या रुग्णांत वाढ होते. त्यापासून बचाव होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. 

काय काळजी घ्याल?  मास्क वापरा : वायू प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडल्यावर मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.  पाण्याने नाक स्वच्छ करा : बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने नाक स्वच्छ केल्यास, संसर्ग व  सर्दी पासून बचाव होतो. नाकात गेलेले धूलीकण धुवून निघतात.

मुंबई आणि परिसरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. बांधकामे वाढली असून विविध विकास कामे सुरू झाल्याने धुलिकणात प्रचंड वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये देखील वाढ झाली आहे. थंडीमुळे अनेकदा नाक जाम होते. वायू प्रदूषणात वाढ झाल्याने, नागरिकांनी कोमट पाण्याने नाक स्वच्छ करणे, मास्क वापरणे, गरज असेल तरच घराबाहेर पडणे आवश्यक आहे. अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.     - डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान-नाक-घसा विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण