शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

कोरोनाच नाही तर डेंग्यूपासूनही करायला हवा बचाव, महागात पडू शकतात 'ही' लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 10:15 IST

कोरोना आणि डेंग्यूची लक्षणं काही प्रमाणात सारखीच असतात.

हवामानात बदल झाल्यानंतर वेगवेगळे आजार पसरायला सुरूवात होते.  गरमीच्या वातावरणात डेंग्यू आणि स्किन इन्फेक्शनची समस्या सर्वाधिक लोकांना जाणवते. त्यामुळे अनेकांना संक्रमणाचा धोका असतो.  जागोजागी डासांचे प्रमाण वाढल्यामुळे लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. डासांचं प्रमाण वाढल्यानंतर  मॉस्किटो रेपेलंट, उघड्यांवर पाणी साठवून न ठेवणं. या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

सध्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे डेंग्यूच्या लक्षणांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण कोरोना आणि डेग्यूंची लक्षणं काही प्रमाणात सारखीच असतात. डेंग्यूचा डास चावल्यानंतर ३ ते ५ दिवसांनंतर डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. शरीरात ताप पसरण्याचा कालावधी ३ ते १० दिवसांचा देखील असू शकतो.

ताप

डेंग्यूचं सगळ्यात पहिलं लक्षण अचानक ताप येणं, थंडी वाजणं, अंगदुखी आहेत. या आजारात शरीर थकल्यासारखं वाटतं. सुरूवातील अंग गरम होतं. त्यावेळी शरीरातील तापमान सुमारे १०० ते १०२ °F असू शकतं. अशी समस्या जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्या, जास्त उशीर केल्यास समस्या वाढण्याची शक्यता असते.

डोळ्यांमध्ये वेदना

डोळ्यांमध्ये असहय्य वेदना होणं हे डेंग्यूचं लक्षण आहे. यात डोळे जड झाल्यासारखे वाटतात. हा त्रास लवकर बरा होणारा नसतो. जर तुम्हाला तापासोबतच डोळ्यांमध्ये जळजळ किंवा  डोळे दुखण्याची समस्या जाणवत असेल तर तज्ञांशी संपर्क साधून तपासणी करून घ्या.

भूक न लागणं

सामान्य तापांप्रमाणेच डेंग्यूमध्येही भूक मरते. तुम्ही अंगदुखी, डोकेदुखीने इतके असह्य असता की, त्यामुळे तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा नसते. तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही.त्यामुळे भूक मरणे हा अगदी सर्वसाधारण त्रास या दिवसांमध्ये होतो.

याशिवाय अंगावर बारीक पुरळ येणे, हातपाय, डोके दुखणे, उलटी होणे या लक्षणे दिसतात. रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे, औषधांना रुग्णाचा प्रतिसाद न मिळणे असे परिणाम होतात. तसंच प्लेटलेट कमी झाल्यामुळे काहीवेळा रुग्णाच्या नाका-तोंडातून रक्तही येतं. त्यामुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी होते. यापैकी कोणतीही लक्षणं दिसत असल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सdengueडेंग्यू