विवागितेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर कारवाईची मागणी- जोड
By admin | Updated: February 22, 2016 19:28 IST
कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा...
विवागितेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर कारवाईची मागणी- जोड
कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा...विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी २०० ते ३०० समाजबांधवांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची भेट घेऊन डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली.पोलिसांची मध्यस्थी...मृतदेह ताब्यात न उचलण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पोलीस अधीक्षक प्रवीण वाडिले यांनी मध्यस्थी करुन नातेवाईकांची समजूत काढली. प्रथम शवविचेछेदन करु व त्यानंतर काय अहवाल येतो त्यानुसार कारवाई करु असे वाडिले यांनी नातेेवाईकांना सांगितले. त्यानंतर विवाहितेचा मृतदेह धुळे वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. इनकॅमेरा शवविचेछेदनची मागणी...विवाहितेचे शवविच्छेदन धुळे येथे व ते इन कॅमेरा करण्यात यावे, अशी मागणी नातेेवाईकांनी केली. त्यानंतर मृतदेह धुळ्याला नेण्यात आला. पोलीस दाखल...गणपती हॉस्पिटलसमोर प्रचंड गर्दी झाल्याने व नातेवाईकांची मागणी पाहता तेथे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले व त्यांचे सहकारी लक्ष ठेऊन होते. नवजात बालकाची प्रकृती चांगली...प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्यू झाला. नवजात बालकाची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले. दोन लहान मुले...विवाहितेच्या पश्चात या नवजात बालकासह आणखी एक मुलगा आहे. तसेच पती, सासू, आई असा परिवार आहे. मोलमजुरी करणारे कुटुंब....मयत विवाहितेचे पती लखन घुमाने हे मोलमजुरी करुन आपला संसार चालवित होते. या विवाहितेच्या मृत्यूमुळे त्यांच्यासह माहेरच्या मंडळींवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोट...शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर व तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कारवाई करण्यात येईल. -प्रवीण वाडिले, पोलीस निरीक्षक