शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची क्वारंटाईन आणि कोरोना चाचणीपासून सुटका होणार?, तज्ज्ञांची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 21:46 IST

कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना नागरिकांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना नागरिकांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना प्रवासादरम्यान क्वारंटाईन करणं किंवा त्यांची कोरोना चाचणी देखील केली जाऊ नये अशी शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. कोरोना लसीसाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञांच्या समितीनं आणि लसीकरणासाठी निर्धारित करण्यात आलेल्या तांत्रिक अॅडवायझरी ग्रूपनं आरोग्य मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत याबाबतची शिफारस केली आहे. 

कोविड-१९ वर्किंग ग्रूपचे चेअरमन डॉ.एनके अरोडा देखील या बैठकीत सहभागी होती. तज्ज्ञांनी केलेली शिफारस देशाबाहेर प्रवास करणाऱ्या नागरिकांसंदर्भातील असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच ज्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि त्यांना याआधी कोरोनाची लागण होऊन गेली आहे अशा नागरिकांनाही देशांतर्गत प्रवासादरम्यान क्वारंटाइन, कोरोना चाचणीपासून सवलत द्यावी, असाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेचे सविस्तर मुद्दे राज्यांना देखील पाठविण्यात आले आहेत जेणेकरुन याबाबत संबंधित राज्य सरकारांना पुढील निर्णय घेता येईल. 

लसीकरण पूर्ण झालेले व्यक्ती कोण?कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊन कमीत कमी दोन आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला आहे, अशाच नागरिकांना लसीकरण पूर्ण झालेले नागरिक म्हणता येईल. तज्ज्ञांच्या बैठकीत चर्चा झालेले मुद्दे सार्वजनिक करण्यात आलेले असले तरी अजूनही काही राज्यांमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांकडेही आरटीपीसीआर चाचणीची मागणी केली जात आहे. विविध राज्यांच्या विविध नियमांमुळे नागरिक आणि ट्रॅव्हल कंपन्यांना देखील मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 

"तज्ज्ञांच्या शिफारसी केलेल्या असूनही अनेक राज्यांमध्ये अजूनही प्रतिबंध कायम आहेत. त्यामुळे यात केंद्रानं लक्ष घालून एक सर्वसमावेशक आदेश जारी करण्याची गरज आहे", असं ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ज्योती मायल यांनी सांगितलं. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या