शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
4
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
5
तीन सरकारी बस एकमेकांवर घडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
6
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
7
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
8
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
9
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
10
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
11
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
12
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
13
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
14
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
15
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
17
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
18
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
19
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
20
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...

'ओमिक्रॉन'विरोधात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस प्रभावी आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 22:01 IST

Omicron Coronavirus Variant : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना नवीन व्हेरिएंटविरुद्ध सक्रिय राहण्याचे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. 

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत SARS-CoV-2 चा नवीन व्हेरिएंट 'ओमिक्रॉन' (Omicron) समोर आल्यानंतर अनेक देशात पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भारताची सुद्धा कोरोनाच्या या व्हेरिएंटबाबत चिंता वाढली आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना नवीन व्हेरिएंटविरुद्ध सक्रिय राहण्याचे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. 

दक्षिण आफ्रिकेने बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) नवीन व्हेरिएंटची माहिती दिली आणि बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्येही हा व्हेरिएंट असल्याचे म्हटले आहे जात आहे. कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याचे म्हटले जात आहे. या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने 'Omicron' असे नाव दिले आहे. 

आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीज विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा म्हणाले की, कोरोनावर वापरल्या जाणार्‍या mRNA लस ओमिक्रॉनवर परिणामकारक ठरू शकत नाहीत. पांडा म्हणाले, “mRNA लसी स्पाइक प्रोटीन आणि रिसेप्टर इंटरॅक्शनकडे निर्देशित केल्या जातात. त्यामुळे mRNA लसींना कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये आलेल्या बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे, परंतु सर्व लसी सारख्या नसतात. 

कोव्हिशिल्ड ( Coveshield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) आपल्या शरीरात एक वेगळ्या अँटीजन सादरीकरणाद्वारे (Antigen Presentation)  प्रतिकारशक्ती (Immunity)निर्माण करतात. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत ओमिक्रॉनमध्ये संरचनात्मक बदल पाहिले आहेत, परंतु हा व्हेरिएंट कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक प्राणघातक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे, असे डॉ. पांडा यांनी सांगितले. 

डॉ पांडा म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटनेने या सर्व गोष्टींचा तपास केला आहे आणि या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत आहे की गंभीर स्वरूपाचा आजार किंवा अधिक मृत्यू होत आहेत, हे शोधण्यासाठी आम्हाला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटने या व्हेरिएंटला चिंताजनक  (Variant of Concern) असे म्हटले आहे. दरम्यान, या व्हेरिएंटमध्ये 10 उत्परिवर्तन (Mutations)असल्याचे शास्त्रज्ञांना आधीच अभ्यासात आढळून आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस