शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

धोका वाढला! भारतानं रशियाला मागे टाकल्यानंतर; कोरोनाबाबत WHO नं दिली धोक्याची सुचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 11:04 IST

CoronaVirus News & latest Updates : जसजसं लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जात आहे. तसतशी कोरोनाची दुसरी लाटसुद्धा येत आहे.

अमेरिकेत कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ब्राजिल आणि भारतातही दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.  रविवारी कोरोना संक्रमणाचे १ लाख ८० हजार केस समोर आल्या आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या चोविस तासात ३६०० पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ५ लाख ३६ हजाारांवर पोहोचला आहे.

रविवारी अमेरिकेत ४४ हजार, ब्राजिलमध्ये २६ हजार तर भारतात २४ हजार नवीन रुग्ण समोर आले आहेत. स्पेनच्या उत्तर- पश्चिमी क्षेत्रातील गलिसियामध्ये कोविड 19 चे संक्रमण वेगाने पसरत आहे. श्रीलंकेतही कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे ११५  दिवस बंद ठेवल्यानंतर शाळा सुरू करण्यात येणार आहेत. 

कोरोना व्हायरसचे सगळ्यात घातक आणि भयावह रुप अजूनही दिसलेलं नाही अशी माहिती WHO नं दिली आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे पाच लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. WHO चे प्रमुख टेडरॉस एडनहॅम यांनी सांगितले की, काही देशांमध्ये माहामारी वेगाने पसरत आहे. जसजसं लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जात आहे. तसतशी कोरोनाची दुसरी लाटसुद्धा येत आहे. तर काही देशांमध्ये संक्रमणाचे रौद्र रुप अजूनही दिसलेले नाही. 

WHO कडून हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या परिक्षणांवर बंदी घालण्यात आली होती. मलेरिया विरोधी औषध हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एड्सवरील लोपिनवीर आणि रिटोनवीरचे कॉम्बिनेशनचे डोस देण्यावर पुन्हा बंदी आणली आहे. डब्ल्यूएचओने म्हटल्यानुसार या औषधांच्या वापराने मृत्यूदरामध्ये कोणतीही घट झालेली नाही. डब्ल्यूएचओ जारी केलेल्या सूचनेनुसार य़ा दोन औषधांच्या वापराने कोरोनाविरोधात वापरण्यात येणाऱ्या अन्य औषधांच्या तुलनेत मृत्यूदरामध्ये कोणतीच घट झालेली नाही.

उलट मृत्यूदर वाढत चालला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार डब्ल्यूएचओ शनिवारी याबाबत खुलासा केला आहे. औषधांच्या चाचणीवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या शिफारशीनुसार या औषधांच्या वापरावर बंदी आणण्यात येत आहे.  गेल्या काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन निष्प्रभ ठरत असल्याने क्लिनिकल ट्रायलवर बंदी आणली होती. 

जीवाशी खेळ! कोरोना संक्रमित होण्यासाठी 30 हजार लोकांची तयारी...

काळजी वाढली! 'ही' समस्या असलेल्यांना दुसऱ्यांदा होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना