शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना आता आपल्यातून कधीच जाणार नाही का? तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर चिंता वाढवणारं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 10:42 IST

Coronavirus News : वैज्ञानिकांनी हा रिपोर्ट ११७ देशांमधील आकड्यांच्या आधारावर तयार केला आहे. वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की, कोरोनापासून स्वतःचा बचाव हाच एकमेव पर्याय आहे.

कोरोना व्हायरसच्या थैमानाला आता लोक कंटाळले आहेत. आपल्या घरातील आणि इतरांच्या घरातील होणारे मृत्यू पाहून 'कोरोना(Coronavirus) आता थांब रे बाबा' असं सहजपणे लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. दुसरीकडे वॅक्सीनेशनचं  कामही वेगाने सुरू आहे. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणंही निश्चित असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अशात आता आणखी एका रिसर्चने आपली चिंता वाढणार आहे. रिसर्च केलेल्या वैज्ञानिकांनुसार,  आता आपल्याला कोरोनासोबतच जगण्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, हा व्हायरस (Virus) कधीच संपणार नाही. म्हणजेच हा कायम जिवंत राहणार.

मेडिकल सायन्सनुसार, कोणत्याही व्हायरसचं अस्तित्व कधीच नष्ट होत नसतं. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरस वर्षातून एकदा आपल्या पीकवर असेल. यामुळे अनेकांना आपला जीवही गमावावा लागू शकतो. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. अशातच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. (हे पण वाचा : Corornavirus : टक्कल असलेल्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका, अधिक गंभीर आजारी पडण्याचा रिसर्चमधून दावा)

जर्मनीच्या हेडलबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ आणि चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सनं कोरोना कायम जिवंत राहाणार असल्याचा दावा केला आहे. हा रिसर्च जनरल साइन्टिफिकमध्येही प्रकाशित केला गेला आहे. या रिपोर्टमध्ये विषाणू दिर्घकाळ राहाणार असल्याच्या दाव्यासोबत इतरही अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. (हे पण वाचा : कोरोना रूग्णाच्या डेड बॉडीला स्पर्श केल्याने संक्रमण पसरतं का? वाचा एक्सपर्ट काय सांगतात....)

या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की,  जगातील उत्तर आणि दक्षिणेकडील देशांमध्ये कोरोनाचं थैमान जास्त असेल. सोबतच उन्हाळा, प्रचंड उष्णता किंवा थंडी, यापैकी कोणत्याही स्थितीमध्ये कोरोनाचं थैमान जराही कमी होणार नाही. वातावरणाचा कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काहीच उपयोग होणार नाही. 

वैज्ञानिकांनी हा रिपोर्ट ११७ देशांमधील आकड्यांच्या आधारावर तयार केला आहे. वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की, कोरोनापासून स्वतःचा बचाव हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी लसीकरणानंतरही कोरोनापासून बचावासाठी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मास्क लावा, अंतर ठेवा आणि नियमितपणे हात धुवा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनInternationalआंतरराष्ट्रीय