कोरोना रूग्णाच्या डेड बॉडीला स्पर्श केल्याने संक्रमण पसरतं का? वाचा एक्सपर्ट काय सांगतात....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 03:15 PM2021-05-07T15:15:32+5:302021-05-07T15:27:10+5:30

Coronavirus : सतत वाढत्या मृत्यूच्या आकड्यांमुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आपलेच लोक आपल्या लोकांच्या मृतदेहांना रस्त्यावर सोडून देत आहेत.

Corona dead body covid19 infections expert opinion question answer | कोरोना रूग्णाच्या डेड बॉडीला स्पर्श केल्याने संक्रमण पसरतं का? वाचा एक्सपर्ट काय सांगतात....

कोरोना रूग्णाच्या डेड बॉडीला स्पर्श केल्याने संक्रमण पसरतं का? वाचा एक्सपर्ट काय सांगतात....

Next

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने भारतात आता घातक रूप घेतलं आहे. देशात रोज कोरोनाच्या लाखो केसेस समोर येत आहेत. हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. अशात या संकटाच्या काळात लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. अशाच काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न वेळोवेळी तज्ज्ञांकडून होत आहे. 

सतत वाढत्या मृत्यूच्या आकड्यांमुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आपलेच लोक आपल्या लोकांच्या मृतदेहांना रस्त्यावर सोडून देत आहेत. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, जर कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या डेड बॉडीला स्पर्श केल्याने किंवा डेड बॉडीजवळ गेल्याने त्यांनाही कोरोना होईल का? यावर तज्ज्ञांनी उत्तर दिलं आहे. (हे पण वाचा : Coronavirus : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाकडून किती दिवसांनी दुसऱ्यांना संक्रमणाचा धोका नसतो? एक्सपर्ट काय सांगतात)

 

इंडिया टुडेच्या कोविड हेल्पलाइनवर एम्समध्ये कार्यरत असलेले डॉ. प्रवीण गुप्ता यांनी कोविडशी संबंधित अनेक प्रश्नांवर उत्तरे दिली. याच चर्चेदरम्यान एक प्रश्न विचारला गेला की, ज्यांचा निधन कोरोनामुळे झालं, त्यांच्या डेड बॉडीला स्पर्श केल्याने कोरोना होतो का?

यावर डॉ. प्रवीण गुप्ता म्हणाले की, 'जेव्हा एखाद्याचं कोरोनामुळे निधन होतं. तेव्हा त्या व्यक्तीची डेड बॉडी चांगल्या प्रकारे रॅप केली जाते. अशात डेड बॉडीमधून कोरोना पसरण्याची रिस्क कमी होते. कोरोना हवेतून पसरतो, डेड बॉडी श्वास घेत नाही, ना खोकते ना शिंकते. अशात त्या डेड बॉ़डीमुळे कोरोना होत नाही'.

डॉ. गुप्ता असंही म्हणाले की, जर तुम्ही रॅप केलेल्या डेड बॉडीला स्पर्श केला तर हात चांगले धुवायला विसरू नका आणि सर्व कोविड गाइडलाईनचं पालन करा

दरम्यान हा प्रश्न अशा स्थिती फार महत्वाचा ठरतो जेव्हा देशात अशा घटना समोर येत आहे की, जर घरातील कुणाचा कोरोनामुळे जीव जात असेल तर नातेवाईक त्यांची बॉडी घेत नाहीत. अशावेळी प्रशासन, अनोळखी लोकच त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. पण हेही खरं आहे की, तुम्ही कोविड गाइडलाईनचं पालन केलं तर कोरोनाचा धोका कमी होतो.  
 

Web Title: Corona dead body covid19 infections expert opinion question answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.