शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: काय सांगता! कोरोना झालाय की नाही हे कुत्रे शोधू सांगतात; अँटिजन, RTPCR चाचणीपेक्षाही जलद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 07:51 IST

‘अँटिजन’ पेक्षा कुत्रे वेगाने करतात कोरोनाचे निदान; फ्रान्समधील वैज्ञानिकांचे संशोधन

नवी दिल्ली : कोरोनामुळे सध्या जगभरच हाहाकार उडाला आहे. या रोगावर औषधे, प्रतिबंधात्मक लस शोधण्याबाबत युद्धपातळीवर संशोधन सुरु आहे. लागण झाली आहे की नाही याचे निदान करण्यासाठी नवनव्या पद्धती शोधल्या जात आहेत.

अशातच फ्रान्समधील वैज्ञानिकांना केलेल्या संशोधनात गुन्ह्याचा तपास करणारे कुत्रे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे शोधू शकतात, असे दिसून आले आहे. गुन्हे तपासासाठी मदत घेतली जात असलेले कुत्रे वास घेण्याच्या शक्तीसाठी प्रशिक्षित केलेले असतात. फ्रान्सच्या वैज्ञानिकांना असे आढळून आले आहे की, हे कुत्रे एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे आरटीपीसीआर चाचणीच्या निष्कर्षापेक्षाही जास्त अचूकपणे सांगण्यास सक्षम आहेत. 

हुंगतात घामाचा वास

पॅरिसच्या नॅशनल व्हेटरनरी स्कूल ऑफ एल्फोर्डमध्ये याबाबत अधिक संशोधन करण्यात आले आहे. हे कुत्रे त्या व्यक्तीच्या घामाच्या वासावरून त्याच्यात झालेल्या कोरोना संक्रमणाबाबत अचूक अनुमान काढू शकतात, असे दिसून आले आहे. रॅपिड अँटिजन चाचणीत निदान करण्यासाठी किमान १५ मिनिटे लागतात. निदान करण्याचे हे काम कुत्रे काही मिनिटात करण्यास सक्षम आहेत.

कुत्र्यांचे निदान ९७ टक्के अचूक पॅरिसच्या नॅशनल व्हेटरनरी स्कूल ऑफ एल्फोर्डच्या संशोधकांना संशोधनात हे आढळले की, कुत्रे त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेच्या बळावर मानवाला कोरोनाचे संक्रमण झाले की नाही याचा निष्कर्ष ९७ टक्क्यांपर्यंत अचूक सांगतात. संशोधक डॉमिनिक ग्रैंडजीन म्हणाले की, मानवी शरीर कोरोना संक्रमणाविरोधात जी प्रतिक्रिया देते ती त्याचा घाम आणि लाळेतून समोर येते. तिचा वास कुत्रे घेऊन ओळखू शकतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या