शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'मेड इन इंडिया' लसीच्या दुसऱ्या चाचणीला सुरूवात होणार; लवकरच खुशखबर मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 16:25 IST

CoronaVirus News & Latest Updates : ड्रग्स रेग्युलेटरी विभागाकडून स्वदेशी लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील  चाचणीस  मंजूरी मिळाली आहे.

भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना संक्रमणाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. मागिल २४ तासात कोरोनाच्या संक्रमणामुळे आतापर्यंत ९० हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ब्राझिलला मागे टाकत भारत दुसऱ्या क्रमाकांवर आला आहे. जगभरात कोरोना लसीच्या चाचण्या सुरू आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्स रेग्युलेटरी विभागाकडून स्वदेशी लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील  चाचणीस  मंजूरी मिळाली आहे. या लसीचे अंतिम टप्प्यातील ट्रायल ७ सप्टेंबर म्हणजेच आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे.  

आरोग्य सेवेतील डायरेक्टर जनरल यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ सप्टेंबरला आरोग्य तज्ज्ञांची व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. यादरम्यान भारत बायोटेकच्या लसीबाबत चर्चा करण्यात आली. तसंच या लसीच्या दुसऱ्या चाचणीसाठी  मान्यता देण्यात आली आहे. रिपोर्ट्नुसार चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी ३८० स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. डोज दिल्यानंतर चार दिवसांपर्यंत  डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली स्वयंसेवकांना ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून लसीच्या साईड इफेक्टसबाबत माहिती मिळवता येऊ शकते. भारत बायोटेकच्या लसीचे भारतातील वेगवेगळ्या भागात चाचण्या सुरू  झाल्या आहेत.

इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसमधील चाचणीतील मुख्य तज्ज्ञ डॉ. ई. वेकंट राव यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील चाचणीत या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आले नाही. भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या सहयोगानं ही लस  तयार करण्यात आली आहे. कोवॅक्सिन या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या एकूण १२ केंद्रांवर ट्रायल सुरू आहेत. नागपूरमध्ये ५५ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली होती. अनेकांना ही लस दिल्यानंतर सौम्य तापाची लक्षणं दिसून आली आहेत.

या आठवड्यापासूनच रशियाची लस उपलब्ध होण्याची शक्यता

कोरोना विषाणूच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या फैलावामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी रशियाने कोरोनाविरोधातील लस विकसित केल्याचा दावा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता रशियाने अजून एक खुशखबर दिली आहे. नागरिकांना या आठवड्यापासूनच कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे रशियाने सांगितले आहे. रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या आठवड्यापासून कोरोना विषाणूविरोधातील स्पुटनिक V ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. ही लस रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी लाँच केली होती.

रशियन वृत्तसंस्था TASS ने रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमधील डेप्युटी डायरेक्टर डेनिस लोगुनोव्ह यांचया हवाल्याने सांगितले की स्पुटनिक V या लसीचा आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीनंतर व्यापक प्रमाणात उपयोग केला जाईल. आरोग्य मंत्रालय या लसीची चाचणी घेणार आहे. त्यासाठी आम्ही लवकरच परवानी घेऊ. त्यांनी सांगितले की सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध करून देण्याची एक निश्चित प्रक्रिया आहे. १० ते १३ सप्टेंबरदरम्यान नागरिकांच्या वापरासाठी कोरोनावरील लसीची परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांना लस दिली जाईल.

कोरोनावरील ही लस मॉस्कोमधील गमलेया रिसर्च इंस्टिट्युटने रशियन आरोग्य मंत्रालयासोबत मिळून एडेनोविषाणूला बेस बनवून तयार केली आहे. या लसीच्या दोन चाचण्या ह्या या वर्षी जून-जुलैमध्ये करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ७६ स्वयंसेवक सहभागी झाले होते. ही लस दिल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात १०० टक्के अँटीबॉडी विकसित झाल्या होत्या.

 हे पण वाचा-

खुशखबर! ३ महिन्यानंतर आपोआप चांगली होताहेत कोरोनामुळे संक्रमित झालेली फुफ्फुसं, तज्ज्ञांचा दावा 

CoronaVirus : चिंताजनक! २०२३ पर्यंत कोरोना विषाणू पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या