शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’: बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 03:35 IST

कोरोनामध्ये कावासाकी डीसिज होत नाही पण त्या आजारासारखी लक्षणे येतात आणि या आजाराप्रमाणे काही काळासाठी हृदयाभोवती सूज येऊन उपचारांची गरज पडू शकते

डॉ. अमोल अन्नदातेभारतात लहान मुलांमध्ये कोरोना अगदी सौम्य स्वरूपाचा असून घातक नसला तरी काही ठिकाणी कावासाकी या आजारासारखी लक्षणे कोरोना संसर्गाच्या ३ ते ४ आठवड्यांनंतर दिसून आली आहेत.कावासाकी डीसिज् काय आहे?कावासाकी हा ५ वर्षाखालील मुलांना होणारा व रक्तवाहिन्या, हृदयावर परिणाम करणारा आजार आहे.

कोरोनामध्ये नेमके काय होते ?कोरोनामध्ये कावासाकी डीसिज होत नाही पण त्या आजारासारखी लक्षणे येतात आणि या आजाराप्रमाणे काही काळासाठी हृदयाभोवती सूज येऊन उपचारांची गरज पडू शकते. याचे प्रमाण खूप कमी म्हणजे १ लाखात १ असले तरी हे लवकरात लवकर ओळखता आले आणि त्वरित उपचार सुरु करता आले तर त्याचा फायदा होतो व गुंतागुंत टळते. म्हणून हे सर्र्वाना माहित असणे आवश्यक आहे.

कोरोनामध्ये कावासाकीसदृश्य आजार नेमका कधी होतो ?हा आजार कोरोना संसर्ग सुरु असताना नव्हे तर कोरोना संपून गेल्यावर तीन ते ४ आठवड्यांनंतर होतो. कोरोनानंतरच्या कावासाकी

सदृश्य आजाराची लक्षणे काय ?ताप, अंगावर लालसर चट्टे, चिडचिड करणे, अस्वस्थ वाटणे ही कोरोना नंतरच्या कावासाकी सदृश्य आजाराची मुख्य लक्षणे आहेत. मुलाला कोरोना संसर्ग झाल्यावर ३ ते ४ आठवड्यांनंतर ही लक्षणे आली तर त्वरित आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. कोरोना संसर्ग नसेल व घरातील कोरोना संसर्गित व्यक्तीशी संपर्क आला व ही लक्षणे आली तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घाबरून जाऊ नये. हा आजार कावासाकी नसून कावासाकीसारखा आहे, म्हणून मुलांवर कोरोना संसर्गानंतर लक्ष ठेवावे. याचे प्रमाण खूप कमी आहे व झाले तरी यावरउपचार करता येतात म्हणून मुळीच घाबरून जाऊ नये.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य