शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’; कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 01:50 IST

तुम्ही एक मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहात आणि बंद खोलीत कोणी मोठ्याने बोलले तर तुम्हाला कोरोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो

डॉ. अमोल अन्नदाते

आपण खोकणे, शिंकणे या बाबतीत काळजी घेतो पण अजून एक गोष्ट आहे जी कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. ती म्हणजे बोलणे. अनेकांना मोठ्याने बोलण्याची सवय असते. त्यातच फोनवर बोलताना ग्रामीण भागात अजूनही असा समज आहे कि मोठ्याने बोलल्याशिवाय मोबाईलवर आवाज नीट जात नाही. म्हणून सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर अनेक जण मोठ्याने बोलत असतात. तसेच मोबाईलवर बोलताना किंवा समोरासमोर बोलताना समोरच्याला नीट कळावे म्हणूनही अनेकजण नेमका त्याच वेळी मास्क खाली करतात.

संशोधन काय सांगतेतुम्ही एक मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहात आणि बंद खोलीत कोणी मोठ्याने बोलले तर तुम्हाला कोरोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो. मोठ्याने बोलल्याने १००० मायक्रो ड्रॉपलेट हवेत सोडले जातात व मास्क नसेल आणि खोली बंद असेल तेव्हा ते एकमीटरपेक्षा जास्त अंतरावर पसरतात. तसेच विषाणू १४ मिनिटे म्हणजे हळू बोलण्याच्या तुलनेत जास्त वेळ हवेत राहतात. जर हळू आवाजात बोलले आणि मास्क लावलेला असला तर ही शक्यता खूप कमी होते.

बोलताना पुढील काळजी घ्यासमोरच्याला ऐकू जाईल एवढ्याच आवाजात हळू बोला. फोनवर व समोरासमोर बोलताना मास्क खाली करू नका. उलट मास्कने नीट नाक, तोंड झाकले आहे का हे तपासा व मग बोला. कमी बोला, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक बोलू नका. कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी ज्या गप्पा मारायच्या होत्या त्या घरी येऊन फोन वर किंवा व्हिडीओ कॉलवर मारा. बोलताना एक मीटर पेक्षा लांब उभे राहा व चेहरा समोरासमोर येणार नाही असे उभे राहून किंवा बसून बोला. कार्यालयात बैठक घ्यायची असल्यास दार, खिडक्या उघड्या ठेवा.

कोरोनाबाधित होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीने समोरासमोर घरातील व्यक्तीशी बोलूच नये. काय हवे, नको ते बंद दाराआडून सांगावे कोरोनाबाधित व्यक्तीशी बोलायचेच असल्यास दोघांनी मास्क वापरून एकमेकांना ९० डिग्री मध्ये उभे राहून बोलावे.(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या