शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: 'या' चुकांमळे लसीनंतरही कोरोना; आढळत आहेत अनेक पॉझिटिव्ह रुग्ण, संसर्ग कसा होतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 05:30 IST

Corona Vaccination: भारतात सध्या दैनंदिन रुग्णसंख्या घटली असली तरी जे कोरोनाबाधित सापडत आहेत त्यांच्यापैकी ८७ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे आहेत. 

ठळक मुद्देअमेरिकेत आतापर्यंत ४९ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. भारतात मात्र हे प्रमाण ८ टक्के आहे.लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या वाढणेही अत्यावश्यक आहे.ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशा लोकांच्या निष्काळजीपणामुळेही संसर्ग वाढत आहे

कोरोनाप्रतिबंधक लसींचे दोन डोस घेऊनही कोरोनाने गाठल्याची अनेक उदाहरणे सध्या अमेरिकेत आढळून येत आहेत. तज्ज्ञांनी याची तीन कारणे सांगितली आहेत. एक म्हणजे कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा झपाट्याने होत असलेला फैलाव, लसीकरणाची मंद गती आणि कोरोनानियमांचे उल्लंघन. भारतात तर या तीनही गोष्टींचा अमेरिकेपेक्षा कैक पटींनी अभाव आहे. 

लसीकरणानंतरही संसर्ग कसा होतो?कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेली व्यक्ती डेल्टा व्हेरिएंटच्या संपर्कात आल्यास लसीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती विषाणूला रोखण्यात अपयशी ठरते. म्हणूनच लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या वाढणेही अत्यावश्यक आहे. लसीकरणानंतर अँटिबॉडी मोठ्या संख्येने निर्माण होणे गरजेचे असते. त्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. तसे न झाल्यास कोरोना संसर्ग होण्याची शक्यता बळावते. ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशा लोकांच्या निष्काळजीपणामुळेही संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अशा लोकांनी मास्क लावणे, गर्दी टाळणे, अंतरनियम पाळणे, हात निर्जंतुक करणे इत्यादी गोष्टींचे काटेकोर पालन करायला हवे. 

अमेरिकेच्या तुलनेत भारतात काय स्थिती?

भारतात सध्या दैनंदिन रुग्णसंख्या घटली असली तरी जे कोरोनाबाधित सापडत आहेत त्यांच्यापैकी ८७ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ४९ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. भारतात मात्र हे प्रमाण ८ टक्के आहे. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अशा लोकांना अमेरिकेत कोरोना नियमांत सूट देण्यात आली आहे. तिथे टाळेबंदीही मागे घेण्यात आली आहे. भारतात मास्कबंदीमध्ये अजून तरी सूट देण्यात आलेली नाही. परंतु केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डेटानुसार मास्कधारींची संख्या कमी झाली आहे. 

तज्ज्ञांचे म्हणणे...जगातली कोणतीही कोरोनाप्रतिबंधक लस १०० टक्के परिणामकारक नाही. लस ही एक छत्री आहे. जी पावसापासून वाचवू शकते परंतु वादळापासून नाही. लस सीटबेल्टसारखीच आहे. म्हणजे सीटबेल्ट लावला असला तरी खबरदारी घेऊनच ड्रायव्हिंग करावे लागते. तद्वत लस घेतली असली तरी कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावीच लागेल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाIndiaभारत